तमिळनाडूत चित्रपटगृहांचा स्थानिक कराच्याविरुद्ध बंद

पीटीआय
मंगळवार, 4 जुलै 2017

स्थानिक 30 टक्के कर रद्द करण्याची मागणी या संघटनेने केली असून केरळ सरकारने याप्रकारचा कर रद्द केल्याचे त्यांचे म्हणणे आहे. जीएसटीच्या व्यतिरिक्त 30 टक्के हा स्थानिक कर असल्याने तो आम्ही भरू शकत नाही, असे स्पष्ट करीत चित्रपटगृह मालकांनी आज बंद पाळला

चेन्नई - देशात नव्याने लागू करण्यात आलेल्या वस्तू आणि सेवा कराच्या अतिरिक्त स्थानिक 30 टक्के कर लागू केल्याच्या निषेधार्थ तमिळनाडूतील एक हजार चित्रपटगृहांनी आज बंद पाळला. त्याचप्रमाणे या कराविरुद्ध लढा चालू ठेवण्याचा निर्णय केला आहे.

आम्ही 30 टक्के स्थानिक कराच्या विरुद्ध आहोत; कारण हा जीएसटीच्याव्यतिरिक्त असा आहे. आम्ही जीएसटीचे समर्थन करीत आहोत, तमिळनाडू चित्रपटगृह मालक आणि वितरक असोसिएशनचे अध्यक्ष अभिरमी रामनाथन यांनी सांगितले. स्थानिक 30 टक्के कर रद्द करण्याची मागणी या संघटनेने केली असून केरळ सरकारने याप्रकारचा कर रद्द केल्याचे त्यांचे म्हणणे आहे. जीएसटीच्या व्यतिरिक्त 30 टक्के हा स्थानिक कर असल्याने तो आम्ही भरू शकत नाही, असे स्पष्ट करीत चित्रपटगृह मालकांनी आज बंद पाळला, असे रामनाथन यांनी सांगितले.

गेल्या शनिवारपासून लागू झालेल्या जीएसटीमध्ये शंभर रुपयांहून कमी दर असलेल्या तिकिटावर 18 टक्के तर शंभर रुपयांहून अधिक असलेल्या तिकिटावर 28 टक्के जीएसटी लागू करण्यात आला आहे.

. . . . . .