...म्हणून न्यायालयाच्या कार्यक्षमतेवर परिणाम; सरन्यायाधीशांची चिंता!

वृत्तसंस्था
बुधवार, 11 जानेवारी 2017

नवी दिल्ली : सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश जगदीशसिंह खेहर यांनी न्यायाधीशांच्या रिक्त जागा भरण्याची गरज अधोरेखित केली असून रिक्तपदांमुळे न्यायालयाच्या कार्यक्षमतेवर परिणाम होत असल्याबद्दल चिंता व्यक्त केली आहे.

एका प्रकरणाच्या सुनावणीदरम्यान खेहर म्हणाले, 'सर्वोच्च न्यायालयातील न्यायाधीशांच्या रिक्तपदांमुळे न्यायालयाच्या कार्यक्षमतेवर परिणाम होत आहे. सर्वोच्च न्यायालयात न्यायाधीशांच्या एकूण 31 जागा आहेत. मात्र सध्या केवळ 23 न्यायाधीशच आहेत. त्यामुळे दैनंदिन कामकाज पार पाडणे कठीण जात आहे.'

सर्वोच्च न्यायालयाचे माजी न्यायाधीश टी एस ठाकूर यांनीही न्यायाधीशांच्या रिक्तपदांबद्दल चिंता व्यक्त केली होती. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत झालेल्या एका कार्यक्रमात त्यांना ही बाब नमूद करताना अश्रू अनावर झाले होते. यावर्षी नोव्हेंबर महिन्यात संविधान दिनाच्या निमित्ताने झालेल्या कार्यक्रमात ठाकूर यांनी सरकार न्यायाधीशांची भरती करत नसल्याचा, आरोप केला होता. तसेच न्यायालयातील पायाभूत सुविधांबद्दलही त्यांनी नाराजी व्यक्त केली होती.

Web Title: CJI Khehar expresses concern over shortage of judges in Supreme Court