वसुंधरा राजेंचे सेलिब्रेशन चहाच्या टपरीवर!

वृत्तसंस्था
रविवार, 12 मार्च 2017

राजस्थानच्या मुख्यमंत्री वसुंधराराजे शिंदे पदपथावरील एका चहावाल्याकडे सामान्य लोकांसोबत बसून चहाचा आस्वाद घेत अनोखी 'चाय पे चर्चा' केली. पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकांमध्ये जबरदस्त विजय मिळविल्यानंतर भाजप कार्यकर्ते जल्लोष करीत आहेत. मात्र, वसुंधरा राजे यांनी अत्यंत साध्या पद्धतीने हा विजय साजरा केला. 

जयपूर : राजस्थानच्या मुख्यमंत्री वसुंधराराजे शिंदे पदपथावरील एका चहावाल्याकडे सामान्य लोकांसोबत बसून चहाचा आस्वाद घेत अनोखी 'चाय पे चर्चा' केली. पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकांमध्ये जबरदस्त विजय मिळविल्यानंतर भाजप कार्यकर्ते जल्लोष करीत आहेत. मात्र, वसुंधरा राजे यांनी अत्यंत साध्या पद्धतीने हा विजय साजरा केला. 

हाय प्रोफाईल मुख्यमंत्री वसुंधरा राजे या अत्यंत साध्या पद्धतीने समान्यांसोबत चहा घेताना पाहून अनेकजण आश्चर्यचकीत झाले. बघता बघता तेथे हजारोंची गर्दी जमा झाली. त्यानंतर भाजपा कार्यकर्त्यांनी 'केसरिया में हरा-हरा, राजस्थान में वसुंधरा'चे घोषणा देऊन त्यांचा गौरव केला. मोदी लाटेमध्ये भाजपने उत्तरप्रदेश आणि उत्तराखंडमध्ये विरोधकांचा सुपडासाफ करून टाकला. ती हवा सध्या असून, त्याचं सेलिब्रेशन सर्वत्र चालू असताना मुख्यमंत्री वसुंधरा राजे या मात्र चहाचा स्वाद घेण्यासाठी आणि लोकांशी चर्चा करण्यासाठी थेट पदपथावरील एका चहाच्या टपरीवर आवर्जून थांबल्या.

वसुंधरा राजे यांनी तेथे उपस्थित लोकांशी चर्चा केली. जवळपास 15 मिनिटं त्यांनी लोकांशी चर्चा केली आणि म्हटलं की देशात ही मोदी मॅजिक आहे. इतिहासात पहिल्यांदा भाजपला उत्तर प्रदेशात इतक्या मोठ्या प्रमाणात जागा मिळाल्या आहेत. यासाठी त्यांनी विजयाचा हिरो पंतप्रधान मोदी असल्याचं म्हटलं आहे.