नाकातून डोक्‍यात गेलेले झुरळ बाहेर काढले

वृत्तसंस्था
शुक्रवार, 10 फेब्रुवारी 2017

नाकाद्वारे झुरळाने डोळ्याच्या मागील भागात प्रवेश केला. यामुळे महिलेला जाग येऊन डोळ्याच्या मागे प्रचंड खाजवू लागले.

चेन्नई : एका शस्त्रक्रियेनंतर येथील डॉक्‍टरांना चेन्नईमधील महिलेच्या नाकावाटे डोक्‍यात गेलेले झुरळ बाहेर काढण्यात यश मिळाले. या महिलेची प्रकृती आता स्थिर आहे.

संबंधित महिला रात्री झोपेत असताना हे झुरळ नाकात शिरले. नाकाद्वारे झुरळाने डोळ्याच्या मागील भागात प्रवेश केला. यामुळे महिलेला जाग येऊन डोळ्याच्या मागे प्रचंड खाजवू लागले. त्यामुळे तातडीने रुग्णालयात गेल्यावर डॉक्‍टरांनी नाकातून पाणी घालत ते स्वच्छ केले. मात्र, तरीही खाज कायम राहिल्यावर या महिलेने तज्ज्ञ डॉक्‍टरांकडे तपासणी केली.

एन्डोस्कोपद्वारे तिच्या नाकाची तपासणी केली असता त्यांना एक झुरळ आत हालचाल करत असल्याचे लक्षात आले आणि त्यांच्यासह महिलेलाही धक्का बसला. या झुरळाने पार कवटीच्या खालच्या भागापर्यंत मजल मारली होती. नाकातून आत शिरून त्याला बारा तास उलटून गेले तरी ते जिवंतच होते. यानंतर डॉक्‍टरांनी व्हॅक्‍यूम क्‍लिनरसारख्या यंत्राचा वापर करत ते झुरळ तसेच जिवंत बाहेर काढले.

टॅग्स

देश

नवी दिल्ली : ब्ल्यू व्हेल गेममुळे केरळ आणि देशाच्या अन्य भागात होणाऱ्या मुलांच्या आत्महत्या पाहता राष्ट्रीय बालहक्क संरक्षण...

गुरुवार, 17 ऑगस्ट 2017

पाटणा : बिहारमधील पूरस्थिती आज आणखी गंभीर झाली असून, राज्यातील पूरबळींची संख्या आता 98 वर पोचली आहे. पुरामुळे 15 जिल्ह्यांतील 93...

गुरुवार, 17 ऑगस्ट 2017

कोडाईकॅनल (तमिळनाडू) - मणिपूरमधून सशस्त्र दल विशेषाधिकार कायदा (अफस्पा) मागे...

गुरुवार, 17 ऑगस्ट 2017