#FuelPriceHike नेटिझन्स म्हणतात, 'अब की बार कमल नहीं खिलेगा यार'

गुरुवार, 24 मे 2018

गेले काही दिवस सतत इंधन दरवाढ होत आहे. पेट्रोल,डिझेलच्या वाढणाऱ्या किंमतींमुळे सामान्यांचे बजेट कोलमडले आहे. या दरवाढीचा सामान्यावर काय परिणाम होतो याबाबत ई सकाळ च्या वाचकांनी दिलेल्या प्रतिक्रीया पुढे देण्यात आल्या आहेत.

गेले काही दिवस सतत इंधन दरवाढ होत आहे. पेट्रोल,डिझेलच्या वाढणाऱ्या किंमतींमुळे सामान्यांचे बजेट कोलमडले आहे. या दरवाढीचा सामान्यांवर काय परिणाम होतो? याबाबत 'ई सकाळ'च्या वाचकांनी दिलेल्या प्रतिक्रीया पुढे देण्यात आल्या आहेत.

फेसबुक आणि ट्विटरवर इंधनाच्या वाढलेल्या या किंमतींबाबत सध्या नेटिझन्स व्यक्त होत आहेत. 'ई सकाळ' तर्फे याबाबत प्रतिक्रीया जाणुन घेण्याचा प्रयत्न करण्यात आला. यावेळी इंधन दरवाढीचे काही जणांकडून समर्थन करण्यात आले तर काहींनी त्यावर टिका केली. सोशल मिडीयावर हा विषय सध्या बराच चर्चिला जात आहे.

पेट्रोल, डिझेलचे भाव वाढल्याने आर्थिक नियोजन बिघडत असल्याची प्रतिक्रीया काही वाचकांनी दिली तर काही जण दारू आणि पेट्रोलची तुलना करत या दरवाढीचे समर्थन करण्याचा प्रयत्न करताना दिसले.

 

Web Title: comments on social media about fuel price hike