उत्तर प्रदेशमधील हिंसाचारात वाढ; देशातील हिंसाचारात घट

वृत्तसंस्था
मंगळवार, 7 फेब्रुवारी 2017

नवी दिल्ली : उत्तर प्रदेशमध्ये 2016 या एका वर्षात इतर राज्यांच्या तुलनेत सर्वाधिक धार्मिक हिंसेच्या घटना घडल्याची माहिती केंद्रीय गृह राज्यमंत्री किरण रिजिजु यांनी आज (मंगळवार) लोकसभेत सादर केलेल्या माहितीतून समोर आली आहे. तर, मागील वर्षीच्या तुलनेत यावर्षी देशातील एकूण हिंसेच्या घटना कमी झाल्याचे आढळून आले आहे.

रिजिजु यांनी आज देशातील विविध राज्यात घडलेल्या हिंसेच्या घटनांविषयी माहिती सादर केली. या यादीनुसार 2015 या एकाच वर्षात उत्तर प्रदेशमध्ये हिंसेच्या 155 घटना घडल्या होत्या. मात्र 2016 मध्ये अशा घटनांमध्ये वाढ होऊन ही संख्या 162 वर पोचली आहे. मणिपूरमध्ये हिंसेची एकही घटना घडलेली नाही. तर उत्तराखंडमध्ये आठ घटना घडल्या आहेत.

पंजाबमध्ये 2014 आणि 2015 मध्ये हिंसेची एकही घटना घडलेली नव्हती. मात्र 2016 मध्ये एक घटना घडल्याचे दिसत आहे. राजस्थानमध्ये 72 तर बिहारमध्ये हिंसेच्या 61 घटना घडल्या आहेत. महाराष्ट्रात 2015 मध्ये हिंसेच्या 105 घटना घडल्या होत्या. तर 2016 मध्ये केवळ 68 घटना घडल्या आहेत.

देश

जनता बेहाल; नेत्यांकडून परस्परांवर आरोप प्रत्यारोप पाटणा: बिहारमध्ये अतिवृष्टीमुळे आलेल्या पुरात आतापर्यंत तीनशे जणांचा बळी...

बुधवार, 23 ऑगस्ट 2017

सर्वोच्च न्यायालयाच्या निकालावर नाराजी कोलकाता: सर्वोच्च न्यायालयाने "तोंडी तलाक'ची प्रथा बेकायदा ठरविण्याचा ऐतिहासिक निकाल...

बुधवार, 23 ऑगस्ट 2017

नवी दिल्ली: आम आदमी पक्षाच्या कार्यालयासाठी राजधानीतील मध्यवर्ती भागात बंगला देण्याचा निर्णय मागे घेण्याचा आदेश नायब राज्यपालांनी...

बुधवार, 23 ऑगस्ट 2017