कर्ज बुडवून परदेशात फरार होणाऱ्यांची मालमत्ता होणार जप्त

वृत्तसंस्था
रविवार, 22 एप्रिल 2018

कोट्यवधींची कर्जे बुडवून परदेशात पसार झालेल्या व्यक्तीला देशात परतण्यास भाग पडावे म्हणून अशा गुन्हेगारांची देशातील मालमत्ता जप्त करण्याचा अधिकार केंद्र सरकारला देण्यासाठी वटहुकूम काढण्यास केंद्रीय मंत्रिमंडळाने शनिवारी मंजुरी दिली. 

नवी दिल्ली : देशातील विविध बँकांची कर्जे बुडविल्याची अनेक प्रकरणे समोर आली आहेत. यातील अनेकांनी कर्जे बुडवून परदेशात पलायन केल्याची प्रकरणेही उघडकीस आली आहेत. अशा गोष्टींना लगाम लावण्यासाठी केंद्र सरकारकडून पावले उचलण्यात आली आहेत. कर्ज बुडवून परदेशात फरार होणाऱ्या कर्जबुडव्यांची मालमत्ता आता जप्त करण्यात येणार आहे.

Property seized

कर्जे बुडविण्यासारखे मोठे आर्थिक गुन्हे करून देशातून पलायन करणाऱ्या आर्थिक गुन्हेगारांविरोधात केंद्र सरकारने कडक पावले उचलली आहेत. कोट्यवधींची कर्जे बुडवून परदेशात पसार झालेल्या व्यक्तीला देशात परतण्यास भाग पडावे म्हणून अशा गुन्हेगारांची देशातील मालमत्ता जप्त करण्याचा अधिकार केंद्र सरकारला देण्यासाठी वटहुकूम काढण्यास केंद्रीय मंत्रिमंडळाने शनिवारी मंजुरी दिली. 

दरम्यान, ज्या फरार व्यक्तीविरोधात न्यायालयाने अटक वॉरंट बजावले आहे, अशी व्यक्ती देशाबाहेर पलायन करून किंवा मायदेशी परत येण्यास नकार देऊन खटल्याला सामोरे जाणे टाळत आहे, अशी व्यक्ती यापुढे 'फरार आर्थिक गुन्हेगार' मानली जाणार आहे. यामध्ये आर्थिक गुन्ह्याची किमान मर्यादा 100 कोटी रुपये ठरविण्यात आली आहे.

Web Title: Confiscation of fishermen fined for criminal offenses Property Seized Central government ordinance