उत्तर प्रदेशात 'सायकल'ला काँग्रेसचा 'हात'

वृत्तसंस्था
मंगळवार, 17 जानेवारी 2017

लखनौ - उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री अखिलेश यादव यांना सायकल हे चिन्ह मिळाल्यानंतर आता काँग्रेसने आगामी विधानसभा निवडणुकीसाठी समाजवादी पक्षाबरोबर (सप) युती करण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच काँग्रेसच्या मुख्यमंत्रिपदाच्या उमेदवार शीला दीक्षित यांनी आपली दावेदारी मागे घेतली आहे.
 
फेब्रुवारी-मार्च महिन्यात होणाऱ्या उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकांसाठी काँग्रेस-समाजवादी पक्ष यांची आघाडी होईल, अशी घोषणा आज काँग्रेसतर्फे करण्यात आली.

काँग्रेस नेते गुलाम नबी आझाद यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले की, आगामी विधानसभा निवडणुकांमध्ये काँग्रेस व समाजवादी पक्ष सोबत निवडणूक लढवतील. तसेच काँग्रेसच्या मुख्यमंत्रिपदाच्या उमेदवार शीला दीक्षित यांना दावेदारी मागे घेण्यास सांगण्यात आले आहे.

उत्तर प्रदेशात समाजवादी पक्ष (सप), बहुजन समाज पक्ष (बसप), काँग्रेस आणि भाजप या प्रमुख पक्षांमध्ये तुल्यबळ लढत पाहायला मिळणार आहे. समाजवादी पक्ष आणि काँग्रेसच्या आघाडीमुळे राजकीय घडामोडींना वेग येणार आहे.