काँग्रेसने फेडरल फ्रंटमध्ये सामील होण्याबाबत विचार करावा - ममता बॅनर्जी

वृत्तसंस्था
गुरुवार, 26 एप्रिल 2018

 2019 च्या लोकसभा निवडणूका भाजपला जिंकणे कठीण आहे. असे मत एका स्थानिक वृत्तवाहिेनीशी बोलताना पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी व्यक्त केले.

कोलकाता - काँग्रेस सोबत आल्यास फेडरल फ्रंटची ताकद वाढेल याचा फायदा राज्यात भाजपला रोखण्यास होईल. काँग्रेसने फेडरल फ्रंटमध्ये सामील होण्याबाबत विचार करायला हवा.  2019 च्या लोकसभा निवडणूका भाजपला जिंकणे कठीण आहे. असे मत एका स्थानिक वृत्तवाहिनीशी बोलताना पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी व्यक्त केले.

सर्व स्थानिक पक्षांनी एकत्र येऊन काम करणे गरजेचे आहे, किमान देशाचे हित सर्व स्थानिक पक्षांनी लक्षात घेऊन एकत्र यायला हवे. राज्यातील राजकारणात आपण आनंदी आहोत, लोकांच्या हिेताचे काम कायम करत राहण्याची इच्छा यावेळी बोलताना त्यांनी व्यक्त केली. 

Web Title: Congress has to decide whether it will join federal front said by Mamata Banerjee