काँग्रेसने निवडणुकीपूर्वीच मैदान सोडले: मोदी

वृत्तसंस्था
रविवार, 5 नोव्हेंबर 2017

देशाने जीएसटीचे स्वागत केले असून, मध्यम वर्गाचा फायदा झाला आहे. आम्ही गरिबांपर्यंत सर्व गोष्टी पोहचवत आहोत. देशात कोट्यवधींची होत असलेली लूट आम्ही थांबवली आहे. हिमाचल प्रदेशात रेल्वे आणि रस्त्यांचे जाळे वाढवून पर्यटनाला चालना देण्यात येईल.

शिमला - यंदाच्या निवडणुकीत काही मजा नाही. कारण, काँग्रेसने निवडणुकीपूर्वीच मैदान सोडले आहे. निवडणूक एकतर्फी होत आहे, अशी जोरदार टीका पंतप्रधान नरेंद्र मोदींनी काँग्रेसवर केली.

हिमाचल प्रदेशमध्ये निवडणुका होत असून, पंतप्रधान मोदींनी आज (रविवार) ऊना येथे सभा घेतली. या सभेत त्यांनी काँग्रेसवर जोरदार टीका करताना कोणताही 'पंजा' आता गरिबांचा हक्क हिरावून घेऊ शकत नाही, असे म्हटले आहे.

मोदी म्हणाले, की देशाने जीएसटीचे स्वागत केले असून, मध्यम वर्गाचा फायदा झाला आहे. आम्ही गरिबांपर्यंत सर्व गोष्टी पोहचवत आहोत. देशात कोट्यवधींची होत असलेली लूट आम्ही थांबवली आहे. हिमाचल प्रदेशात रेल्वे आणि रस्त्यांचे जाळे वाढवून पर्यटनाला चालना देण्यात येईल. आमचे येथे सरकार येऊ किंवा नाही येऊदेत पण गरिबांच्या हक्काची लढाई सुरुच राहील. काँग्रेसच्या राज्यात 100 पैकी 85 रुपये कोठे जात होते. आता काँग्रेस निवडणुकीपूर्वीच मैदान सोडून पळाली आहे.