राहुल गांधींनी घेतली एटीएमबाहेरील नागरिकांची भेट

वृत्तसंस्था
सोमवार, 21 नोव्हेंबर 2016

नवी दिल्ली - नोटाबंदीच्या निर्णयावरुन देशभरातील नागरिकांना समस्यांना सामोरे जावे लागत असताना आज (सोमवार) सकाळी काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी एमटीएमबाहेर रांगेत थांबलेल्या नागरिकांची भेट घेऊन समस्या जाणून घेतल्या

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पाचशे आणि हजार रुपयांच्या नोटा बंद करण्याचा निर्णय घेतल्यानंतर बँकाबाहेर आणि एटीएमबाहेर नागरिकांच्या रांगा आहेत. राहुल गांधी यांनी यापूर्वी बँकाबाहेर रांगेत उभे राहून पैसे बदलून घेताना नागरिकांच्या समस्या जाणून घेतल्या होत्या. आता आज सकाळी त्यांनी एटीएमबाहेर थांबलेल्या नागरिकांच्या समस्या जाणून घेतल्या. तसेच रांगेवरून वाद घालणाऱ्या नागरिकांचा वादही मिटविला.

नोटबंदीच्या निर्णयावरून सरकारला घेरण्यासाठी काँग्रेस पुरेपूर प्रयत्न करत आहे. राहुल गांधी यांनी जहांगीरपुरी, इंद्रलोक आणि झकीरा परिसराचा दौरा करत एटीएमला भेट दिली. राहुल गांधी यांनी यापूर्वीही मुंबईतही एटीएम रांगेत उभे राहिलेल्यांची भेट घेत त्यांच्याशी बातचीत केली होती.