सरन्यायाधीशांविरोधातील महाभियोगाची याचिका काँग्रेसकडून मागे 

वृत्तसंस्था
मंगळवार, 8 मे 2018

काँग्रेसच्या नेतृत्वाखाली सात विरोधी पक्षांनी गेल्या महिन्यात सरन्यायाधीश दीपक मिश्रा यांच्याविरोधात महाभियोगाची नोटीस राज्यसभा अध्यक्ष वेंकय्या नायडू यांच्याकडे सादर केली होती. मात्र, ही नोटीस नायडू यांनी फेटाळून लावली होती. भारतात प्रथमच सरन्यायाधीशांविरोधात महाभियोगाची नोटीस देण्यात आली होती.

नवी दिल्ली : सरन्यायाधीशांविरोधातील महाभियोगाची नोटीस फेटाळण्याच्या राज्यसभा अध्यक्षांच्या निर्णयाला आव्हान देणारी याचिका आज (मंगळवार) काँग्रेसकडून मागे घेण्यात आली. काँग्रेसच्या दोन खासदारांनी आज सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती.

प्रतापसिंह बाजवा (पंजाब) आणि अमी हर्षदराय याज्ञिक (गुजरात) या राज्यसभेतील काँग्रेसच्या दोन खासदारांनी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. या याचिकेची तातडीने सुनावणी घ्यावी, अशी विनंती वरिष्ठ वकील आणि काँग्रेस नेते कपिल सिब्बल यांनी केली होती. मात्र, आज काँग्रेसकडून ही याचिका मागे घेण्यात आली आहे. आज पाच सदस्यांच्या घटनापीठापुढे या याचिकेवर सुनावणी होणार होती. मात्र, त्यापूर्वीच याचिका मागे घेण्यात आली.

काँग्रेसच्या नेतृत्वाखाली सात विरोधी पक्षांनी गेल्या महिन्यात सरन्यायाधीश दीपक मिश्रा यांच्याविरोधात महाभियोगाची नोटीस राज्यसभा अध्यक्ष वेंकय्या नायडू यांच्याकडे सादर केली होती. मात्र, ही नोटीस नायडू यांनी फेटाळून लावली होती. भारतात प्रथमच सरन्यायाधीशांविरोधात महाभियोगाची नोटीस देण्यात आली होती.

Web Title: Congress withdraws Supreme Court petition on removal of Chief Justice Dipak Mishra