काळवीट शिकार प्रकरण : सलमानचा आज निकाल

वृत्तसंस्था
गुरुवार, 5 एप्रिल 2018

जोधपूर : काळविटाची शिकार केल्याप्रकरणाच्या खटल्यातील मुख्य आरोपी असलेला अभिनेता सलमान खान याच्या खटल्याचा निकाल जोधपूर न्यायालय उद्या (ता. 5) देणार आहे.

निकाल ऐकण्यासाठी सलमान खान तसेच या प्रकरणातील सहआरोपी सैफअली खान, तब्बू, सोनाली बेंद्रे आणि नीलम हे कलाकारही न्यायालयात उपस्थित राहणार आहेत. 
या प्रकरणाची अंतिम सुनावणी 28 मार्चला संपली. त्या वेळी मुख्य न्यायदंडाधिकारी देवकुमार खत्री यांनी निकाल राखून ठेवला होता. 

वीस वर्षांपूर्वी एक व दोन ऑक्‍टोबर 1998 रोजी 'हम साथ साथ हैं' या चित्रपटाच्या चित्रिकरणाच्या वेळी कांकणी गावात दोन काळविटांची शिकार केल्याचा आरोप सलमान खानवर आहे. वन्यजीव संरक्षण कायद्याच्या कलम 51 नुसार सलमानवर गुन्हा दखल करण्यात आला होता, तर त्याला शिकारीला प्रवृत्त केल्याचा आरोप अन्य चार कलाकारांवर आहे.

त्या दिवशी रात्री हे सर्व कलाकार जिप्सी कारमधून फिरत होते. सलमान गाडी चालवत होता. त्या वेळी त्यांना काळविटांचा कळप दिसल्यावर सलमानने त्यांच्यावर गोळ्या झाडल्या. यात दोन काळविटांचा मृत्यू झाल्याचा दावा सरकारी वकील भवानीसिंग भाटी यांनी न्यायालयासमोर केला आहे. त्यांचा हा दावा सलमानचे वकील एच. एम. सारस्वत यांनी फेटाळताना, या खटल्यात अनेक त्रुटी असल्याने सलमानवरील आरोप सिद्ध करण्यास ते अपयशी ठरल्याचे म्हटले आहे.

तसेच सुनावणीच्या वेळी खोटे पुरावे आणि खोटे साक्षीदार उभे केल्याचे सारस्वत यांनी म्हटले आहे. तसेच त्या काळविटांचा मृत्यू गोळी लागल्यानेच झाल्याचे सरकारी पक्षाला सिद्ध करता आलेले नाही, असे म्हटले आहे.

Web Title: Court to announce verdict on Salman Khan in blackbuck case