'वरदाह' चेन्नईच्या किनाऱ्यावर धडकले

वृत्तसंस्था
सोमवार, 12 डिसेंबर 2016

चेन्नई/विशाखापट्टणम- वरदाह वादळ आज (सोमवार) दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास चेन्नईच्या किनारपट्टीवर येऊन धडकले. त्यादरम्यान येथे जोरदार पावसालाही सुरवात झाली. वारदाह वादळाचा वेग ताशी 110 ते 120 किलोमीटर एवढा असून, राष्ट्रीय आपत्ती निवारण दल (NDRF), भारतीय नौदल आणि प्रशासन हे एकत्रितपणे वादळामुळे होणारे नुकसान रोखण्यासाठी व त्यावर उपाययोजना करण्यासाठी कामाला लागले आहे. 

बंगळूर, हैदराबाद, मुदराई, कोईम्बतूर या ठिकाणी जाणाऱ्या रेल्वेगाड्या रद्द करण्यात आल्या असल्याचे दक्षिण रेल्वे प्रशासनाकडून सांगण्यात आले. विमानांची उड्डाणे व लँडिंग दुपारी 3 वाजेपर्यंत रद्द करण्यात आली होती. 
किनारपट्टीवर आल्यापासून एक तासाच्या अवधीत हे वेगवान वारदाह वादळ जमिनीवर उतरेल असा अंदाज वर्तविला होता.

तमिळनाडू आणि आंध्रप्रदेशच्या किनारी भागात NDRFची पंधराहून अधिक पथके तैनात करण्यात आली आहेत. बंगालच्या उपसागराच्या किनारी भागात जोरदार पाऊस चालू असताना तिथे राहणाऱ्या सुमारे 9400 लोकांना तिथून बाहेर काढण्यात आले आहे. प्रत्येकी 70 ते 80 जवान असलेल्या सात लष्करी तुकड्यांची जादा कुमक सज्ज ठेवण्यात आली आहे. त्यापैकी एक पथक तिरुवल्लूर येथे रवाना करण्यात आले आहे. 

कल्पक्कम येथे असलेले अणूऊर्जा केंद्र डोळ्यासमोर ठेवून तिथे सर्व प्रकारच्या सुरक्षिततेची खबरदारी घेण्यात आली आहे, असे रेल्वे प्रशासनाने सांगितले.