दलित लेखक मकवानांकडून पुरस्कार वापसी

वृत्तसंस्था
सोमवार, 1 ऑगस्ट 2016

अहमदाबाद - गुजरातमधील उना येथे दलित नागरिकांना झालेल्या मारहाणीच्या निषेधार्थ दलित लेखक अमृतलाल मकवाना यांनी गुजरात सरकारकडे पुरस्कार परत केले आहेत.

मकवाना यांना 2012-13 मध्ये ‘खरापत नू दलित लोकसाहित्य‘ याबद्दल देसी जीवन श्रेष्ठ दलित साहित्य कृती पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. मकवाना यांनी उना येथील घटनेच्या निषेधार्थ या पुरस्कारासह मिळालेली 25 हजार रुपयांची रक्कमही अहमदाबाद जिल्हाधिकाऱ्यांकडे परत केली आहे. उना येथे चार दलित नागरिकांना गायीची कातडी काढल्यामुळे जबर मारहाण करण्यात आली होती. 

गुजरातच्या मुख्यमंत्री आनंदीबेन पटेल यांनी लिहिलेल्या पत्रात मकवाना यांनी म्हटले आहे की, उना येथे दलितांवर झालेल्या अत्याचारामुळे मी खूप व्यथित झालो आहे. त्यामुळे मी पुरस्कार परत करण्याचा निर्णय घेतला आहे.