दलित असल्याची शिक्षा मिळतेय - संदीप कुमाऱ
नवी दि्ल्ली - मी दलित असल्याने माझ्याविरोधात षडयंत्र रचण्यात आले, त्याची शिक्षा मला मिळत आहे. अश्लील सीडीमध्ये मी नसून याची चौकशी करण्यात यावी, असे हकालपट्टी करण्यात आलेले दिल्लीचे मंत्री संदीप कुमार यांनी म्हटले आहे.

आम आदमी पक्षाचे नेते व महिला तसेच बालविकासमंत्री संदीप कुमार यांचे मंत्रिपद काढून घेतल्याचे ट्विट दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी स्पष्ट केले आहे. संदीप कुमार यांच्याशी संबंधित असलेली एक अश्लील सीडी पुढे आल्यानंतर ही कारवाई करण्यात आली. या सीडीमध्ये काही छायाचित्रे व नऊ मिनिटांच्या व्हिडिओचा समावेश आहे. व्हिडिओत संदीप कुमार दोन महिलांसमवेत असल्याचे दिसत असून, ते महिलांना "दिवसा भेटत जाऊ नका, रात्री नऊनंतर येत जा,‘ असे म्हणत आहेत.
या प्रकरणी स्पष्टीकरण देताना संदीप कुमार म्हणाले की, दलित असल्याची किंमत मला मोजावी लागत आहे. मी त्या व्हिडिओमध्ये नाही. या व्हिडिओची तपासणी व्हायला हवी.