दिल्ली बॉंबची अफवा; दिल्ली पोलिसांना दूरध्वनी

वृत्तसंस्था
बुधवार, 19 जुलै 2017

तपासणी केल्यानंतर हा दूरध्वनी बनावट असल्याचे स्पष्ट झाले आहे. त्याचप्रमाणे मोबाईल कुठून करण्यात आला, त्याचाही तपास लागला असून, हा दूरध्वनी उत्तर पश्‍चिम दिल्लीतील रोहिणी येथून आल्याचे स्पष्ट झाले आहे

नवी दिल्ली - पंतप्रधान निवासस्थान, राजीव चौक मेट्रो स्थानक आणि बांगलासाहिब गुरुद्वारा उडवून देण्याची धमकी देणारा दूरध्वनी आज सकाळी दिल्ली पोलिसांना आला. मात्र नंतर तो बनावट असल्याचे सिद्ध झाले. दिल्ली पोलिसांना सकाळी साडेआठ वाजता दूरध्वनी आल्याचे वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी सांगितले.

या तिन्ही ठिकाणी तपासणी केल्यानंतर हा दूरध्वनी बनावट असल्याचे स्पष्ट झाले आहे. त्याचप्रमाणे मोबाईल कुठून करण्यात आला, त्याचाही तपास लागला असून, हा दूरध्वनी उत्तर पश्‍चिम दिल्लीतील रोहिणी येथून आल्याचे स्पष्ट झाले आहे. या दूरध्वनीनंतर संबंधित मोबाईल लगेचच स्वीच ऑफ करण्यात आल्याचे स्पष्ट झाले आहे. मोबाईल करण्याची ओळख पटविण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे, असे त्यांनी सांगितले.