दिग्विजय यांच्याविरुद्ध चार ‘एफआयआर’

जातीय हिंसाचाराबाबत ट्विटरवर दुसऱ्या राज्यातील मशिदीचे आक्षेपार्ह छायाचित्र टाकून धार्मिक तेढ निर्माण केल्याच्या आरोपावरून दिग्विजयसिंह यांच्याविरुद्ध पोलिसांनी चार ‘एफआयआर’ नोंदविले
Digvijaya Singh Police registered four FIR Bhopal
Digvijaya Singh Police registered four FIR Bhopalsakal
Summary

जातीय हिंसाचाराबाबत ट्विटरवर दुसऱ्या राज्यातील मशिदीचे आक्षेपार्ह छायाचित्र टाकून धार्मिक तेढ निर्माण केल्याच्या आरोपावरून काँग्रेस नेते व खासदार दिग्विजयसिंह यांच्याविरुद्ध पोलिसांनी आणखी चार ‘एफआयआर’ नोंदविले

भोपाळ : मध्य प्रदेशातील खारगोनमधील जातीय हिंसाचाराबाबत ट्विटरवर दुसऱ्या राज्यातील मशिदीचे आक्षेपार्ह छायाचित्र टाकून धार्मिक तेढ निर्माण केल्याच्या आरोपावरून काँग्रेस नेते व खासदार दिग्विजयसिंह यांच्याविरुद्ध पोलिसांनी आणखी चार ‘एफआयआर’ नोंदविले आहेत. यापूर्वी स्थानिक रहिवाशाच्या तक्रारीवरून दिग्विजयसिंह यांच्याविरुद्ध पहिला ‘एफआयआर’ नोंदविण्यात आला होता.

भोपाळसह सतना, ग्वाल्हेर, नर्मदापूरममध्ये त्यांच्याविरुद्ध एफआयआर नोंदविण्यात आले. दिग्विजयसिंह यांनी काही युवक मशिदीवर भगवा झेंडा फडकावत असल्याचे छायाचित्रही पोस्ट केले होते. रामनवमीदिवशी खारगोनमध्ये मिरवणुकीत झालेल्या हिंसाचाराचा संदर्भ देत त्यांनी हे छायाचित्र ट्विटरवरून पोस्ट केले होते. त्यांनी नंतर हे ट्विट डिलीट केले होते. दरम्यान, काँग्रेस नेते राहुल गांधी यांचा फेरफार केलेला व्हिडिओ २०१९ मध्ये पोस्ट केल्याप्रकरणी मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांच्याविरुद्ध ‘एफआयआर’ दाखल करण्याची मागणी करणारे पत्र दिग्विजयसिंह यांनी भोपाळच्या पोलिस आयुक्तांना लिहिलेल्या पत्रात केली आहे. आपल्याविरुद्ध दाखल केलेल्या एफआयआरबद्दल ट्विट करून त्यांनी नाराजी व्यक्त केली.

माझ्या प्रश्नांची उत्तरे देण्यापेक्षा माझ्याविरुद्ध एफआयआर दाखल करण्यात आला. ही भाजप मॉडेलची लोकशाही आहे की मोदी मॉडेलची? भाजप आणि भोंदू बाबांच्या द्वेषपूर्ण भाषणांचे काय?

- दिग्विजयसिंह, काँग्रेस नेत

खारगोनमधील घर पाडले

रावनवमीदिवशी झालेल्या हिंसाचारानंतर पंतप्रधान आवास योजेनतून मध्य प्रदेशातील खारगोनमध्ये सरकारी जमिनीवर उभारलेले घर पाडण्यात आले. हे घर दुसरीकडे बांधणे अपेक्षित होते. त्याचप्रमाणे, निवासी कारणाव्यतिरिक्त इतर कारणांसाठी त्याचा वापर केला जात होता, असा दावा मुख्याधिकारी प्रियांका पटेल यांनी केला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com