यूपीच्या विकासासाठी विभाजन गरजेचे : आठवले

यूएनआय
गुरुवार, 29 डिसेंबर 2016

लखनौ - मागास मुस्लिमांना दहा टक्के आरक्षण देण्यावरून वाद निकाली काढण्यासाठी आतापर्यंत ज्यांना आरक्षणाचा लाभ मिळालेला नाही, अशा समाजासाठी 25 टक्के अधिक आरक्षण देण्याच्या भूमिकेचे केंद्रीय सामाजिक न्यायमंत्री रामदास आठवले यांनी समर्थन केले.

लखनौ - मागास मुस्लिमांना दहा टक्के आरक्षण देण्यावरून वाद निकाली काढण्यासाठी आतापर्यंत ज्यांना आरक्षणाचा लाभ मिळालेला नाही, अशा समाजासाठी 25 टक्के अधिक आरक्षण देण्याच्या भूमिकेचे केंद्रीय सामाजिक न्यायमंत्री रामदास आठवले यांनी समर्थन केले.

रिपब्लिकन पक्षाच्या कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी येथे आलेले आठवले यांनी पत्रकारांशी संवास साधताना म्हटले, की आम्हाला सर्वाधिक लक्ष उत्तर प्रदेशवर देण्याची गरज आहे. कारण येथे दलितांवर सातत्याने अत्याचार होत आहेत. ते म्हणाले की, उत्तर प्रदेश मोठे राज्य असून, याचा संपूर्ण विकास करण्यासाठी याचे दोन भागांत विभाजन करणे गरजेचे आहे. या संदर्भात आपण पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजप अध्यक्ष अमित शहा यांच्याशी चर्चा करू, असे त्यांनी नमूद केले. यूपीचे दोन भागांतच विभाजन केल्यास संपूर्ण विकास होऊ शकतो. मायावती यांचा प्रस्ताव हा तीन भागांत विभाजनाचा होता, तो चुकीचा आहे. यामुळे खूपच लहान राज्ये होतील आणि विकास खुंटेल, असे आठवले म्हणाले. त्याचबरोबर पंतप्रधान आणि भाजप अध्यक्षांशी 75 टक्के आरक्षण देणाऱ्या घटनादुरुस्तीबाबत चर्चा करणार आहे. त्यात महाराष्ट्रात मराठा, गुजरातमध्ये पटेल, हरियानात जाट आणि गरीब ब्राह्मण यांचा समावेश आहे. मागासलेल्या मुस्लिमांना दहा टक्के आरक्षण देणे गरेजेचे आहे. मात्र, आर्थिक निकषावर आरक्षण देण्याबाबतच्या पद्धतीला नकार दिला. परंतु, बौद्ध धर्म स्वीकारलेल्या ख्रिश्‍चन समाजालाही आरक्षण देण्याचा विचार झाला पाहिजे, असे आठवले म्हणाले. जर राज्याचे दोन भाग केले तर दलितांवरील वाढत्या अत्याचारावर नियंत्रण मिळवता येणे शक्‍य होईल, असे त्यांनी सांगितले.