बीएसएफकडून पाक रेंजर्सला मिठाई नाही

वृत्तसंस्था
रविवार, 30 ऑक्टोबर 2016

पाकिस्तानी सैनिकांकडून शस्त्रसंधी उल्लंघन सतत होत असून, यामध्ये भारतीय जवान हुतात्मा झाले आहेत. शुक्रवारी पाकिस्तानी सैन्याने माछिल सेक्टरमध्ये केलेल्या गोळीबारात बीएसएफचे दोन जवान हुतात्मा झाले होते.

अमृतसर - भारत आणि पाकिस्तान यांच्यातील संबंधांमध्ये तणाव असल्याने यंदा वाघा सीमेवर पाकिस्तानी रेंजर्सला मिठाई देण्याचा कार्यक्रम रद्द करण्यात आल्याचे, सीमा सुरक्षा दलाने (बीएसएफ) स्पष्ट केले आहे.

भारत आणि पाकिस्तानमधील तणावाचे तीव्र पडसाद वाघा सीमेवरही पहायला मिळाले. दरवर्षी बीएसएफच्या जवानांकडून पाकिस्तानी रेंजर्सला मिठाई देण्यात येते. काश्‍मीरमध्ये पाकिस्तानी सैनिकांकडून शस्त्रसंधी उल्लंघन सतत होत असून, यामध्ये भारतीय जवान हुतात्मा झाले आहेत. शुक्रवारी पाकिस्तानी सैन्याने माछिल सेक्टरमध्ये केलेल्या गोळीबारात बीएसएफचे दोन जवान हुतात्मा झाले होते.

पाकच्या सैनिकांनी शुक्रवारी रात्री अचानक भारतीय चौक्‍यांवर गोळीबार करायला सुरवात केली. या वेळी नितीन यांनी दीर्घपल्ल्याच्या शस्त्राच्या साह्याने पाकच्या गोळीबारास प्रत्युत्तर दिले. या वेळी ते ज्या चेंबरमध्ये होते तेथेच मोठा स्फोट झाल्याने ते गंभीर जखमी झाले, त्यांना जखमी अवस्थेमध्येच लष्कराच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. पण, शनिवारी त्यांचा मृत्यू झाला. पाकिस्तानच्या सीमेवरील कुरापती सुरू असून, आर. एस. पुरा आणि कथुआ भागामध्येही शस्त्रसंधी उल्लंघनाच्या घटना समोर आल्या आहेत.