खटला लवकर निकाली काढण्यासाठी न्यायात तडजोड नको : न्यायालय 

वृत्तसंस्था
मंगळवार, 12 जून 2018

खटला लवकर निकाली काढण्यासाठी न्यायात तडजोड होऊ नये, असे न्यायालयाने म्हटले आहे. 2001 रोजी एका व्यक्तीच्या लूटमारप्रकरणी दोन जणांना झालेली तुरुंगवासाच्या शिक्षेला स्थगिती देण्याची मागणी करणाऱ्या याचिकेवर सुनावणी करताना न्यायालयाने मत व्यक्त केले. अतिरिक्त सत्र न्यायधीश एस. के. गुप्ता यांनी दोघांची याचिका स्वीकारली. 

नवी दिल्ली: खटला लवकर निकाली काढण्यासाठी न्यायात तडजोड होऊ नये, असे न्यायालयाने म्हटले आहे. 2001 रोजी एका व्यक्तीच्या लूटमारप्रकरणी दोन जणांना झालेली तुरुंगवासाच्या शिक्षेला स्थगिती देण्याची मागणी करणाऱ्या याचिकेवर सुनावणी करताना न्यायालयाने मत व्यक्त केले. अतिरिक्त सत्र न्यायधीश एस. के. गुप्ता यांनी दोघांची याचिका स्वीकारली. 

दोषी ठरलेल्या दोघांनी दंडाधिकारी न्यायालयाकडून सुनावलेल्या तीन वर्षांच्या शिक्षेला आव्हान दिले होते. त्यांना पोलिसांच्या दोन विशेष साक्षीदारांची उलटतपासणी घेण्याची संधी दिली नाही, असे याचिकेत म्हटले होते. साक्षीदार क्रमांक चार आणि पाच (पोलिस अधिकारी) यांनी साक्ष देताना याचिकाकर्त्यांकडून लुटलेले सामान जप्त केले असल्याचे म्हटले होते. मात्र, दोघांच्या साक्षी महत्त्वाच्या होत्या.

सत्य समोर आणण्यासाठी प्रत्येकाची साक्ष महत्त्वाची आहे. याचिकाकर्त्यांकडे उलटतपासणीच्या माध्यमातून दोन साक्षीदारांच्या विश्‍वसनीयतेची चाचपणी करण्याशिवाय स्वत:चा बचाव करण्याचे अन्य कोणतेही साधन नव्हते. मात्र, याचिकाकर्त्यांचे वकील उपस्थित नव्हते आणि त्यामुळे आणखी एक संधी देण्याऐवजी उलटतपासणी टाळण्यात आली. खटला लवकरात लवकर निकाली काढण्यासाठी न्यायात तडजोड करायला नको होती. हे प्रकरण सत्र न्यायालयाकडे परत पाठवण्यात आले. दिल्ली न्यायालयाने म्हटले की, गुन्ह्यातील सत्य जाणून घेण्यासाठी त्या साक्षीदारांची उलटतपासणी घेणे गरजेचे होते. साक्षीदारांची लवकर उलटतपासणी घेऊन प्रकरणाचा निपटारा करावा. 
 

Web Title: Do not compromise the judgment for early adoption says Court