बलात्कारप्रकरणी डॉक्‍टरला अटक

वृत्तसंस्था
मंगळवार, 12 जून 2018

मुझफ्फरनगर जिल्ह्यातील मिरापूर गावात एका डॉक्‍टरला वर्षभर महिलेवर बलात्कार केल्याप्रकरणी अटक करण्यात आली आहे, असे पोलिसांनी आज सांगितले.
 

मुझफ्फरनगर : मुझफ्फरनगर जिल्ह्यातील मिरापूर गावात एका डॉक्‍टरला वर्षभर महिलेवर बलात्कार केल्याप्रकरणी अटक करण्यात आली आहे, असे पोलिसांनी आज सांगितले.

आरोपी डॉक्‍टरने त्याचे रेकॉर्डिंग करून वारंवार त्याचा उपयोग महिलेला ब्लॅकमेल करण्यासाठी करीत होता. कैथोरा गावात ही घटना घडली, असे मिरापूर पोलिस ठाण्याचे मनोज चौधरी यांनी सांगितले. साजिद हसन असे डॉक्‍टरचे नाव असून, त्याला काल अटक करण्यात आली आहे. आरोपी डॉक्‍टर पीडित महिलेला हा व्हिडिओ सोशल मीडियावर टाकण्याची धमकी देत सतत ब्लॅकमेल करीत होता, असे पोलिसांनी सांगितले. 

Web Title: The doctor was arrested in the rape case