पराभवाला एकटे राहुल जबाबदार नाही- सिंघवी

वृत्तसंस्था
शनिवार, 11 मार्च 2017

नवी दिल्ली- उत्तर प्रदेश, पंजाब, उत्तराखंड, गोवा व मणिपूरमध्ये झालेल्या विधानसभा निवडणूकीचे निकाल हाती येऊ लागले आहेत. उत्तर प्रदेश, उत्तराखंड व मणिपूरमध्ये काँग्रेस पिछाडीवर गेला आहे. उत्तर प्रदेशातील पराभवाला काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी हे एकटे जबाबदार नाहीत, असे काँग्रेसचे प्रवक्ते अभिषेकमनू सिंघवी यांनी आज (शनिवार) म्हटले आहे.

प्रसारमाध्यमांशी बोलताना सिंघवी म्हणाले, 'विधानसभा निवडणूकांची मतमोजणी सुरू आहे. उत्तर प्रदेशात पक्ष पिछाडीवर आहे. परंतु, याला राहुल गांधी हे एकटे जबाबदार नाहीत. परंतु, ते जबाबदारी स्वःतावर घेतील.'

भारतीय जनता पक्षाने गांधी घराण्याच्या मतदार संघामध्ये मोठी मजल मारली आहे. यामुळे मतदारांनी काँग्रेसला नाकारल्याचे दिसत आहे. यामुळे पक्षाचा मोठा पराभव समजला जात आहे.

सकाळी साडेदहाच्या सुमारास आलेल्या आकडेवारीनुसार आघाडीवरील पक्ष असेः
उत्तर प्रदेशः

भारतीय जनता पक्ष 298,
काँग्रेस 12,
समाजवादी पक्ष 63,
बहुजन समाजवादी पक्ष 21
इतर पक्षांनी 9 जागांवर आघाडी घेतली आहे.

उत्तराखंड :
भारतीय जनता पक्ष 51,
काँग्रेस 15,
इतर 4

मणिपूरः
भारतीय जनता पक्ष 16,
काँग्रेस 12

गोवा :
भारतीय जनता पक्ष - 7
काँग्रेस - 9

पंजाबः
काँग्रेस 63
आम आदमी पक्ष 26
शिरोमणी अकाली दल 27