गुजरातमध्ये शिक्षकांपेक्षा चालकांना अधिक वेतन!

वृत्तसंस्था
शुक्रवार, 17 जून 2016

अहमदाबाद - गुजरात विद्यापीठाने शिक्षक आणि (वाहन) चालकांच्या भरतीबाबत दिलेल्या जाहिरातीत चालकांना शिक्षकांपेक्षा अधिक वेतन असल्याचे दाखविले आहे. हा प्रकार म्हणजे शिक्षण व्यवस्थेचा अपमान असल्याची टीका करण्यात येत आहे.

अहमदाबाद - गुजरात विद्यापीठाने शिक्षक आणि (वाहन) चालकांच्या भरतीबाबत दिलेल्या जाहिरातीत चालकांना शिक्षकांपेक्षा अधिक वेतन असल्याचे दाखविले आहे. हा प्रकार म्हणजे शिक्षण व्यवस्थेचा अपमान असल्याची टीका करण्यात येत आहे.

गुजरात विद्यापीठाने गुजरात कुमार विनय मंदिर शाळेत चालक आणि शिक्षकांच्या भरतीसाठी 10 जून रोजी जाहिरात दिली आहे. गणित, इंग्रजी आणि समाजशास्त्राच्या शिक्षकांना शिक्षणशास्त्रातील पदवी ही अट असून चालकांना केवळ दहावी परीक्षा उत्तीर्ण असण्याची अट आहे. अकरा महिन्यांसाठी चालकांना प्रतिमहिना सात हजार रुपये तर शिक्षकांना प्रतिमहिना केवळ पाच हजार रुपये वेतन असल्याचे जाहिरातीत दिले आहे. तसेच पात्र चालकांना वयाची अट शिक्षिलक्षम असल्याचेही जाहिरातीत म्हटले आहे.

‘ही जाहिरात म्हणजे शिक्षण व्यवस्थेचा अपमान आहे. गांधीजी शोषणाविरुद्ध होते. मात्र विद्यापीठाचा शोषणावर विश्‍वास असल्याचे दिसून येत आहे. त्यांनी चालकाला देऊ केलेले शिक्षकांपेक्षा जास्त आहेच मात्र ते फारच कमी आहे. चालकाचे काम हे कमी दर्जाचे नाही. मात्र या जाहिरातीवरून विद्यापीठ शिक्षकांचे अवमूल्यन करत असल्याचे दिसत आहे‘, अशा प्रतिक्रिया बाबासाहेब आंबेडकर मुक्त विद्यापीठातील गुजराती साहित्याचे प्राध्यापक योगेंद्र पारेख यांनी व्यक्त केल्या. दरम्यान या प्रकाराचा तीव्र निषेध करणारी अनेक पत्रे विद्यापीठाचे कुलगुरू आणि निबंधकांना प्राप्त झाली आहेत.