दुबईत दोन भारतीयांना 500 वर्षांची शिक्षा

वृत्तसंस्था
बुधवार, 11 एप्रिल 2018

लिमोस यांनी त्यांच्या कंपनीच्या माध्यमातून नागरिकांना वेगवेगळी आमिषे दाखवून आपल्या कंपनीमध्ये गुंतवणुकीतून अधिक परतावा देण्याबाबत आश्वासन दिले होते.

अबू धाबी : दुबईत दोन भारतीयांना अटक करण्यात आली. या अटकेनंतर या दोघांनाही न्यायालयात सुनावणीसाठी नेले. न्यायालयाने त्याला तब्बल 500 वर्षांची शिक्षा सुनावली आहे. 37 वर्षांच्या सिडनी लिमोस आणि त्याच्या पत्नीने कोट्यवधींचा आर्थिक गैरव्यवहार केल्याचा आरोप आहे. तसेच या गैरव्यवहारातून हजारो गुंतवणुकदारांना धोका दिल्याप्रकरणी दुबई न्यायालयाने ही शिक्षा सुनावली आहे. 

लिमोस यांनी त्यांच्या कंपनीच्या माध्यमातून नागरिकांना वेगवेगळी आमिषे दाखवून आपल्या कंपनीमध्ये गुंतवणुकीतून अधिक परतावा देण्याबाबत आश्वासन दिले होते. या आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लिमोस यांच्या पत्नीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यांच्या बेकायदेशीपणे कार्यालयात घुसून महत्वाची कागदपत्रे लंपास करण्याचा त्यांच्यावर आरोप आहे.  

दरम्यान, लिमोसला डिसेंबर 2016 मध्ये अटक करण्यात आली होती. त्यानंतर त्याला जामिनावर सुटका करण्यात आली. तसेच मागील वर्षी जानेवारी महिन्यातही त्याला अटक करण्यात आली होती. 

Web Title: Dubai Court Sentenced Two Goans To Over 500 Years Each In Jail