निवडणूक आयोगाने केली चेन्नईच्या पोलिस आयुक्तांची बदली

वृत्तसंस्था
शनिवार, 25 मार्च 2017

आर के नगर येथील पोटनिवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर निवडणूक आयोगाने चेन्नईचे पोलिस आयुक्त एस. जॉर्ज यांची बदली केली आहे.

चेन्नई (तमिळनाडू) - आर के नगर येथील पोटनिवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर निवडणूक आयोगाने चेन्नईचे पोलिस आयुक्त एस. जॉर्ज यांची बदली केली आहे.

तमिळनाडूच्या माजी मुख्यमंत्री जयललिता यांच्या निधनामुळे आर के नगर मतदारसंघाची जागा रिकामी झाली होती. या जागेसाठी पोटनिवडणूक होणार असून त्यासाठी 12 एप्रिल रोजी मतदान होणार आहे. दरम्यान डीएमकेने ही पोटनिवडणूक पारदर्शकपणे व्हावी, यासाठी पोलिस आयुक्तांची बदली करावी अशी मागणी करत निवडणूक आयोगाकडे याचिका दाखल केली होती. आज आयोगाने जॉर्ज यांची बदली केली असून त्यांच्या जागी करन सिन्हा यांची नियुक्ती केली आहे.

सत्ताधारी एआयडीएमके पक्षाला जॉर्ज झुकते माप देऊ शकतात, त्यामुळे मतदान परिणाम होऊ शकतो, असा दावा डीएमकेने केला होता. त्यासंदर्भात डीएमकेचे खासदार टी. के. एस. इलेगोवन, आर. एस. भारती आणि तिरुची सिवा यांच्या शिष्टमंडळाने 17 मार्च रोजी आयोगाची भेट घेतली होती.

Web Title: EC orders transfer of Chennai Police Commissioner