लालूप्रसाद यादव यांच्या कन्येच्या 'सीए'ला 'ईडी'कडून अटक

वृत्तसंस्था
मंगळवार, 23 मे 2017

राष्ट्रीय जनता दलाचे प्रमुख लालूप्रसाद यादव यांची कन्या मिसा भारती हिच्या लेखापालाला (सीए) सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) आज (मंगळवार) अटक केली.

नवी दिल्ली - राष्ट्रीय जनता दलाचे प्रमुख लालूप्रसाद यादव यांची कन्या मिसा भारती हिच्या लेखापालाला (सीए) सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) आज (मंगळवार) अटक केली.

आठ हजार कोटी रुपयांच्या गैरव्यवहारप्रकरणी ईडीने आज सीए राजेश अग्रवाल याला ताब्यात घेतले. मिसा भारती यांना पैसे पुरविल्याचा आरोप राजेशवर ठेवण्यात आला आहे. आज राजेशला पटियाला न्यायालयात हजर केले जाणार आहे. लालूप्रसाद यांच्याशी संबंधित व्यक्तींच्या दिल्ली, गुरगावसह एकूण 22 ठिकाणांवर दोन दिवसांपूर्वीच प्राप्तीकर विभागाचे छापे टाकले होते. बेकायदेशीररित्या झालेल्या एक हजार कोटी रुपयांच्या जमीन खरेदी प्रकरणावरून या 22 ठिकाणी प्राप्तीकर विभागाने छापे टाकले होते. दरम्यान चारा गैरव्यवहारामुळे लालूप्रसाद यादव हे आधीच निशाण्यावर आहेत. राजेशला ताब्यात घेतल्यामुळे त्यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्‍यता आहे.