केरळमधील राज्य सहकारी बँकांची 'ईडी'कडून तपासणी

वृत्तसंस्था
गुरुवार, 22 डिसेंबर 2016

सिटिझन जर्नालिस्ट बनू या
'ई सकाळ'च्या नव्या रचनेत वाचकांच्या मतांना, विचारांना सर्वोच्च प्राधान्य आहे. 
आपण ई सकाळमध्ये सहभागी होऊ शकताः

  • 'सकाळ संवाद'द्वारेः अॅन्ड्रॉईड अॅप डाऊनलोड करा आणि पाठवा बातम्या, लेख, फोटो, व्हिडिओ आणि ऑडिओ. 
  • ई मेलद्वारेः आपले सविस्तर मत ई मेल करा webeditor@esakal.com आणि Subject मध्ये लिहाः CitizenJournalist
  • प्रतिक्रियांद्वारेः व्यक्त व्हा बातम्यांवर, प्रतिक्रियांवर

कन्नूर (केरळ) : अंमलबजावणी संचालनालयाने आज (गुरुवार) कन्नूर, कोझिकोड, थिरसूर येथील राज्य सहकारी बँकांची तपासणी केली. तर केंद्रीय अन्वेषण विभागानेही कोल्लम आणि मल्लापुरम जिल्ह्यात तपासणी केली.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 8 नोव्हेंबर रोजी नोटाबंदीचा निर्णय जाहीर केल्यानंतर 14 नोव्हेंबरपर्यंत केरळमधील कन्नूर, कोझिकोड आणि थिरसूर येथील राज्य सहकारी बँकत मोठ्या प्रमाणात रक्कम जमा झाली होती. त्यामुळे संचालनालयाने 8 नोव्हेंबरपासून 14 नोव्हेंबरपर्यंत या बँकांमध्ये बनावट खाते तयार करून त्यामध्ये रक्कम जमा झाली आहे का किंवा हवालामार्फत रक्कम जमा झाली आहे का दृष्टीने कागदपत्रांची सविस्तर तपासणी केली. अंमलबजावणी संचालनालयाला गुप्तचर संस्थांकडून मिळालेल्या माहितीप्रमाणे दिल्ली, मुंबई, कोलकाता, हैदराबाद, बंगळूर, अहमदाबाद, चेन्नईसह देशभरातील अन्य काही शहरांमध्ये छापा टाकला.

नोटाबंदीचा निर्णय जाहीर झाल्यानंतर विविध माध्यमातून काळा पैसाधारक त्यांच्याकडील पैसे पांढरे करून घेण्याचा प्रयत्न करत होते. त्यामुळेच प्राप्तिकर विभागाने अशा प्रकारांवर नजर ठेवत देशभरातील विविध छापे टाकून कारवाई केली. बुधवारी प्राप्तिकर विभागाने तमिळनाडूच्या मुख्य सचिवांच्या निवासस्थानावर छापा टाकला होता. त्यापूर्वीही काही वरिष्ठ प्रशासकीय अधिकाऱ्यांवर छापे टाकून तपास करण्यात आला होता.