साक्षी महाराजांना निवडणूक आयोगाकडून नोटीस

वृत्तसंस्था
मंगळवार, 10 जानेवारी 2017

उत्तर प्रदेशमध्ये विधानसभा निवडणूक जाहीर झाली असून, आचारसंहिता लागू झाली आहे. प्रचारासाठी धर्माचा वापर करता येणार नसल्याचा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने नुकताच दिला आहे.

नवी दिल्ली - चार बायका करून चाळीस मुलांना जन्म देणारेच लोकसंख्यावाढीला कारणीभूत आहेत, असे वादग्रस्त विधान करणारे भाजपचे खासदार साक्षी महाराज यांना आज (मंगळवार) निवडणूक आयोगाने कारणेदाखवा नोटीस पाठविली आहे.

निवडणूक आयोगाने आज त्यांना नोटीस पाठविताना उद्या (बुधवार) सकाळपर्यंत उत्तर देण्यास सांगितले आहे. या वादग्रस्त विधानामुळे साक्षी महाराज यांच्याविरोधात पोलिसांनी 'एफआयआर' दाखल केली. हे विधान करण्यामागे साक्षी महाराजांचा रोख मुस्लिमांकडे असल्याचा आरोप होत आहे. त्यांच्या या विधानावर विरोधकांनी टीका केली असून, खुद्द भाजपनेही या प्रकरणापासून स्वत:ला चार हात लांब ठेवले आहे. 

उत्तर प्रदेशमध्ये विधानसभा निवडणूक जाहीर झाली असून, आचारसंहिता लागू झाली आहे. प्रचारासाठी धर्माचा वापर करता येणार नसल्याचा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने नुकताच दिला आहे. या पार्श्‍वभूमीवर साक्षी महाराजांच्या विधानामुळे आचारसंहितेचा भंग झाला आहे की नाही, हे पडताळून पाहिले जात आहे. 

देश

बंगळूर : कर्नाटकच्या पोलिस उपमहानिरीक्षक डी. रूपा यांनी भ्रष्टाचार विरोधी पथकास (एसीबी) सादर केलेल्या आणखी एका अहवालामुळे खळबळ...

06.03 AM

नियुक्तीसाठी नवे पाच विभाग कार्मिक मंत्रालयाकडून निश्‍चित नवी दिल्ली: राष्ट्रीय एकात्मतेचा उद्देश डोळ्यांसमोर ठेवून केंद्र...

05.03 AM

जनता बेहाल; नेत्यांकडून परस्परांवर आरोप प्रत्यारोप पाटणा: बिहारमध्ये अतिवृष्टीमुळे आलेल्या पुरात आतापर्यंत तीनशे जणांचा बळी...

बुधवार, 23 ऑगस्ट 2017