अब की बार तीन सौ पार..!

टीम ई सकाळ
शनिवार, 11 मार्च 2017

निवडणूकीच्या आकडेवारीनुसार सकाळी अकराच्या सुमारास भाजपने 308 जागांवर आघाडी घेतली आहे. काँग्रेस 12, समाजवादी पक्ष 54 तर बसप 22 केवळ जागांवर आघाडीवर आहे.

लखनौ : उत्तर प्रदेशात भारतीय जनता पक्षाने प्रथमच एक हाती सत्ता जिंकली असून, 'अब की बार तीन सौ पार...' असे चित्र स्पष्ट झाले आहे.

उत्तर प्रदेशात झालेल्या विधानसभा निवडणूकीत भाजपने मोठी मजल मारली आहे. निवडणूकीच्या आकडेवारीनुसार सकाळी अकराच्या सुमारास भाजपने 308 जागांवर आघाडी घेतली आहे. काँग्रेस 12, समाजवादी पक्ष 54 तर बसप 22 केवळ जागांवर आघाडीवर आहे.

उत्तर प्रदेशातील मतदार राजाने सायकल पंक्चर केली. हत्तीला झोपवले तर पंजाला 'थाप' मारली. विकासाच्या मुद्यावर कमळ फुलवले आहे. समाजवादी पक्ष, काँग्रेस व बहुजन समाज पक्षाने एकत्रित येऊन केलेल्या आघाडीला यश मिळू शकले नसून, मतदारांनी त्यांना स्पष्टपणे नाकारले आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी व भाजप अध्यक्ष अमित शहा यांच्याकडे राज्याची सूत्रे नागरिकांनी सोपवली आहेत. केंद्रात व राज्यात भाजपचे सरकार आल्यास विकास होऊ शकेल, याकडेच नागरिक वळल्याचे दिसत आहे. भारतीय जनता पक्षाने गांधी घराण्याच्या मतदार संघामध्ये एवढे मोठे यश प्रथमच मिळविले आहे. यामुळे समाजवादी पक्ष व काँग्रेसला मोठा फटका बसल्याचे दिसत आहे.