'यूपी'त हवा दलित वा ओबीसी मुख्यमंत्री: साक्षी महाराज 

टीम ई सकाळ
शनिवार, 11 मार्च 2017

देशातील राजकीयदृष्टया अत्यंत संवेदनशील राज्य असलेल्या उत्तर प्रदेशमध्ये भारतीय जनता पक्षास (भाजप) नेत्रदीपक यश मिळणार, हे निश्‍चित झाल्याच्या पार्श्‍वभूमीवर आता या राज्याचे नेतृत्व करण्यासाठी पक्षामध्ये मुख्यमंत्री पदासाठीच्या उमेदवाराचा शोध सुरु झाला आहे.

भाजपचे उत्तर प्रदेशमधील महत्त्वाचे नेते साक्षी महाराज यांनी या राज्याचा मुख्यमंत्री दलित अथवा ओबीसी असावा, अशी अपेक्षा व्यक्त केली आहे. राज्यात दलित समुदायाचे प्रमाण 20 ते 22 टक्के आहे; तर ओबीसी समुदायाचे प्रमाण 27% आहे.

या पार्श्‍वभूमीवर या दोनपैकी एका समुदायामधील मुख्यमंत्री व्हावा, असे साक्षी महाराज यांनी म्हटले आहे. भाजपने उत्तर प्रदेशमधील मुख्यमंत्री पदाच्या उमेदवाराचे नाव अद्यापी घोषित केले नाही.

केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह, योगी आदित्यनाथ या दोन नेत्यांची नावे या स्पर्धेत सर्वाधिक चर्चेत असल्याचे मानले जात आहे. या पार्श्‍वभूमीवर, साक्षी महाराज यांनी व्यक्त केलेली 'अपेक्षा' महत्त्वपूर्ण असल्याचे मानले जात आहे.

Web Title: UP election Sakshi Maharaj Narendra Modi Yogi Adityanath