45 फूट खोल विहिरीतून हत्तीला काढले बाहेर

वृत्तसंस्था
शुक्रवार, 24 मार्च 2017

जवळपास चार तासांच्या अथक प्रयत्नानंतर या हत्तीला सुरक्षितपणे बाहेर काढण्यात यश आले.

चेन्नई : तमिळनाडूमध्ये तब्बल 45 फूट खोल असलेल्या विहिरीत हत्ती पडल्याने येथील शेतकऱ्यांची तारांबळ झाली. हत्तीला बाहेर काढण्यासाठी वनविभागाची मदत घेण्यात आली. वनविभागाच्या आणि अग्निशमन दलाच्या प्रयत्नानंतर या हत्तीला विहिरीतून बाहेर काढण्यात यश आले. 

तमिळनाडूमधील कोवनूर या गावात दोन दिवसांपूर्वी 10 वर्षे वयाचा एक हत्ती रात्रीच्या वेळी पाण्याच्या शोधात भटकत असताना अपघाताने विहिरीत पडला. हत्तीच्या ओरडण्याच्या आवाजाने गावातील लोकांचे त्याकडे लक्ष गेले. 

हत्तीला बाहेर काढण्यासाठी क्रेनची मदत घेण्यात आली. जवळपास चार तासांच्या अथक प्रयत्नानंतर या हत्तीला सुरक्षितपणे बाहेर काढण्यात यश आले.
 

Web Title: elephant taken out with crain from well