फेसबुक मित्राने केला बलात्कार

वृत्तसंस्था
सोमवार, 13 फेब्रुवारी 2017

कोटा (राजस्थान): फेसबुकच्या माध्यमातून मैत्री झालेल्या एकाने वैद्यकीयचे शिक्षण घेणाऱ्या दलित मुलीवर बलात्कार केल्याची घटना उघडकीस आल्याची माहिती पोलिसांनी आज (सोमवार) येथे दिली.

कोटा (राजस्थान): फेसबुकच्या माध्यमातून मैत्री झालेल्या एकाने वैद्यकीयचे शिक्षण घेणाऱ्या दलित मुलीवर बलात्कार केल्याची घटना उघडकीस आल्याची माहिती पोलिसांनी आज (सोमवार) येथे दिली.

याबाबत पीडित मुलीने दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे की, उदयपूरच्या अभियंता असलेल्या क्रिशनवीर सिंग (वय 25) याच्याशी आपली फेसबुकच्या माध्यमातून ओळख झाली होती. त्यानंतर क्रिशनवीर याने अनेकदा कोटा येथे आपली भेट घेतली, असे विजयनगर पोलिसांनी सांगितले. गेल्या वर्षी सप्टेंबरमध्ये आरोपीने आपल्याला लग्नाचे आश्‍वासन देऊन आपल्यावर कोटा आणि जयपूरमध्ये बलात्कार केला. त्यानंतर पीडित मुलगी गर्भवती राहिल्यानंतर आरोपीने तिच्याशी लग्न करण्यास नकार दिला. त्याशिवाय गर्भपात करण्यासाठी तिच्यावर दबाव आणला. पीडित मुलीने आरोपीला वारंवार दूरध्वनी केले; मात्र त्याने कोणताही प्रतिसाद दिला नाही. अखेर पीडित मुलीने स्थानिक महिला वकिलाची मदत मागितली. या महिला वकिलाने काल सिंग याला दूरध्वनी करून मुलगी गर्भपातासाठी तयार असल्याचे सांगितले. सिंग कोटा येथे आल्यानंतर त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला, असे पोलिसांनी सांगितले.