'अमित शहा आणि मोदी झाले बुजगावणे'

वृत्तसंस्था
बुधवार, 18 जुलै 2018

पेरण्या होऊन आता बरेच दिवस झाले आहेत. पीक आल्यानंतर शेतकऱ्यांना त्याची प्राणी आणि पक्षांकडून नासाडी होण्याची भीती असते. यासाठी शेतात बुजगावणे उभे केले जातात. मात्र कर्नाटकमधील शेतकऱ्यांनी बुजगावणे उभे करण्याऐवजी एक अजब प्रकार केला आहे. येथिल शेतकऱ्यांनी आपल्या शेतात थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यांचे कटआउट लावले आहेत.

हुबळी - पेरण्या होऊन आता बरेच दिवस झाले आहेत. पीक आल्यानंतर शेतकऱ्यांना त्याची प्राणी आणि पक्षांकडून नासाडी होण्याची भीती असते. यासाठी शेतात बुजगावणे उभे केले जातात. मात्र कर्नाटकमधील शेतकऱ्यांनी बुजगावणे उभे करण्याऐवजी एक अजब प्रकार केला आहे. येथिल शेतकऱ्यांनी आपल्या शेतात थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यांचे कटआउट लावले आहेत. 

निवडणुकादरम्यान, या नेत्यांनी प्रभाव पडावा यासाठी मोदी आणि अमित शाह यांच्या कटआउटचा वापर केला होता. मात्र निवडणूका संपल्या असल्याने या कटआउटचे काय करायचे, म्हणून कार्यकर्त्यांनी ही कटआउट बुजगावणे म्हणून आपल्या शेतात लावली आहेत. हुबळीमधील एका छोट्याशा गावात हे चित्र पहायला मिळाले आहे.

दरम्यान, कर्नाटकच्या काही भागात चांगला पाऊस झाला आहे. शेतात पिकं चांगली आली आहेत. त्यामुळे आपल्या पिकाचे संरक्षण करण्यासाठी शेतकरी वेगवेगळ्या शक्कल लढवू लागल्याचे यामधून दिसून येत आहे.

Web Title: farmers now use modi shah cutouts as scarecrows in karnataka