तोफा थंडावल्या पण भीती कायम 

firing stopped but fear continued
firing stopped but fear continued

जम्मू -  मागील सलग नऊ दिवसांपासून पाकिस्तानकडून सुरू असलेला तोफगोळ्यांचा मारा थांबला आहे. पाकच्या या शस्त्रसंधी उल्लंघनामध्ये आतापर्यंत अकरा जण ठार झाले असून, 60 जण जखमी झाले आहेत. बुधवारी दुपारीच हा तोफगोळ्यांचा मारा थांबल्याचे सूत्रांनी म्हटले आहे. 

तोफगोळ्यांचा मारा थांबला असला तरीसुद्धा राजौरीतील लाम आणि नौशेरा सेक्‍टरमध्ये गुरुवारी रात्रभर पाकचा गोळीबार सुरूच होता. यामध्ये एक नागरिक जखमी झाला आहे. ऊरी सेक्‍टरमध्येही गुरुवारी रात्री पाकने गोळीबार केल्याचे समजते. तब्बल अर्धा तास हा गोळीबार सुरू होता. तत्पूर्वी पाकिस्तानने जम्मू, कथुआ, सांबा आणि राजौरी जिल्ह्यांतील भारतीय चौक्‍या आणि वाड्या, वस्त्यांना लक्ष्य केले होते. पाकिस्तानच्या संभाव्य शस्त्रसंधी उल्लंघनाचा धोका लक्षात घेऊन सीमावर्ती भागातील एक लाख लोकांना सुरक्षितस्थळी हलविण्यात आले आहे. कथुआ, सांबा आणि जम्मूलगतच छावण्या उभारण्यात आल्या आहेत. पाकिस्तानच्या शस्त्रसंधी उल्लंघनामुळे या भागातील सर्वच व्यवहार ठप्प झाले असून शाळा, शेती, पशुपालन थांबले असल्याचे सूत्रांनी सांगितले. 

रात्रंदिन युद्धाचा प्रसंग 

200 शैक्षणिक संस्था बंद 

800 वेळा यंदा शस्त्रसंधी उल्लंघन 

44 एकूण मृत्युमुखी  

18 हुतात्मा जवान 


आपत्कालीन आराखडा 

भाजपचे प्रदेशाध्यक्ष रविंदर रैना आणि स्थानिक खासदार जुगलकिशोर शर्मा यांनी आज रुग्णालयांना भेटी देत जखमींच्या प्रकृतीची विचारपूस केली. पाकच्या गोळीबाराला सामोरे जाण्यासाठी जम्मू- काश्‍मीर सरकारने स्थानिक प्रशासन आणि पोलिसांना आपत्कालीन नियोजन आखण्याचे निर्देश दिले आहेत. वरिष्ठ अधिकाऱ्यांनाही कोणत्याही स्थितीत आपली केंद्रे सोडू नका, असे निर्देश देण्यात आले आहेत. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com