हैदराबादमध्ये साकारतेय देशातले पहिले 'डॉग पार्क' 

The first Dog Park established in Hyderabad
The first Dog Park established in Hyderabad

हैदराबाद : तेलंगणा राज्यातील हैदराबादमध्ये पाळीव कुत्र्यांसाठी खास "डॉग पार्क'ची निर्मिती केली जात आहे. यामध्ये सर्व प्रकारच्या आधुनिक सुविधांचा समावेश असणार आहे. 

ग्रेटर हैदराबाद महापालिकेने कोंडापूरमध्ये हे पार्क विकसित केले आहे. यामध्ये वॉकिंग ट्रॅक आणि क्‍लिनिकची सुविधाही आहे. ज्या ठिकाणी हे पार्क बनविण्यात आले आहे, त्या ठिकाणी आधी कचऱ्याचे डम्पिंग यार्ड होते. 

पालिकेचे विभागीय आयुक्त डी. हरिचंदना यांनी वृत्तसंस्थेला सांगितले, की या पार्कमध्ये कुत्र्यांना प्रशिक्षण दिले जाणारे उपकरण, कसरतीचे उपकरण, स्प्लॅश पूल, लू कॅफे, दोन लॉन, एक ऍम्पी थिएटर, मोठ्या आणि छोट्या कुत्र्यांसाठी वेगवेगळे अडथळे यांसह अनेक सुविधा आहेत. 

ते म्हणाले, की हे पार्क देशातील पहिले नोंदणीकृत डॉग पार्क आहे. या ठिकाणी एक पशुवैद्यकीय अधिकारी, कुत्र्यांचा प्रशिक्षक, प्रोटोकॉलनुसार स्वच्छता आणि कुत्र्यांना मोफत लसीकरणाचीही सुविधा असेल. 

आम्ही अशा प्रकारचे डॉग पार्क अन्य देशांमध्ये पाहिले होते आणि आपल्या देशातही अशा प्रकारचे आंतरराष्ट्रीय दर्जाचे पार्क का होऊ शकत नाही, या विचारातून हे पार्क तयार करण्यात आले आहे. लोक आपल्या पाळीव कुत्र्यांना या ठिकाणी घेऊन येऊ शकतात आणि पार्कमधील सुविधांचा फायदा घेऊ शकतात, असे हरिचंदना यांनी स्पष्ट केले. या पार्कचे उद्‌घाटन पुढील दहा दिवसांत होणार आहे. 

असे आहे पार्क... 

1.1 कोटी रुपये : पार्कनिर्मितीचा खर्च 
1.3 एकर : जागेत पार्कची निर्मिती 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com