तवांगजवळ हवाई दलाचे हेलिकॉप्टर कोसळले; 5 मृत

वृत्तसंस्था
शुक्रवार, 6 ऑक्टोबर 2017

एमआय - 17 व्ही 5 जातीचे हे हेलिकॉप्टर लष्करी वाहतुकीसाठी वापरण्यात येते. जगातील अत्याधुनिक हेलिकॉप्टर्समध्ये या हेलिकॉप्टरची गणना करण्यात येते. या अपघाताची चौकशी तातडीने सुरु करण्यात आली आहे

नवी दिल्ली - भारतीय हवाई दलाचे एमआय-17 व्ही 5 जातीचे एक हेलिकॉप्टर आज (शुक्रवार) सकाळी अरुणाचल प्रदेशमधील तवांगजवळ कोसळून झालेल्या अपघातामध्ये पाच जण मृत्युमुखी पडल्याचे वृत्त सूत्रांनी दिले आहे.

या अपघातात अन्य एक जवान गंभीर जखमी झाला. या अपघात स्थळापासून चीनची सीमारेषाही जवळच आहे. एमआय - 17 व्ही 5 जातीचे हे हेलिकॉप्टर लष्करी वाहतुकीसाठी वापरण्यात येते. जगातील अत्याधुनिक हेलिकॉप्टर्समध्ये या हेलिकॉप्टरची गणना करण्यात येते.

या अपघाताची चौकशी तातडीने सुरु करण्यात आली आहे.
 

Web Title: Five dead as IAF Mi-17 V5 helicopter crashes in Arunachal Pradesh