गुजरातमध्ये गायिकेवर उधळले 40 लाख

वृत्तसंस्था
सोमवार, 26 डिसेंबर 2016

प्रसिद्ध गुजराथी लोक गायिका किर्तीदान गाधवी यांच्यावर 10 आणि 20 रुपयांच्या नोटांची उधळण करण्यात आली.

अहमदाबाद - गुजरातमधील नवसारी जिल्ह्यात एका संगीत कार्यक्रमात गुजराथी लोकगीत गाणाऱ्या गायिकेवर 10 व 20 रुपयांच्या तब्बल 40 लाख रुपयांच्या नोटांची उधळण करण्यात आली.

नोटाबंदीच्या निर्णयामुळे एकीकडे पैसे मिळविण्यासाठी नागरिक बँका व एटीएमबाहेर गर्दी करत असताना, नवसारी जिल्ह्यात अशी पैशाची उधळपट्टी पहायला मिळाली आहे. रविवारी रात्री हा कार्यक्रम झाला असून, सोशल मिडीयावर याचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे.

प्रसिद्ध गुजराथी लोक गायिका किर्तीदान गाधवी यांच्यावर 10 आणि 20 रुपयांच्या नोटांची उधळण करण्यात आली. गेल्या महिन्यात दायरो फेस्टिव्हल अंतर्गत झालेल्या लोकगीतांच्या कार्यक्रम या गायिकेवर दोन हजार रुपयांच्या नोटांची उधळण करण्यात आली होती.