2019 विसरा, 2024च्या तयारीला लागा- अब्दुल्ला

वृत्तसंस्था
शनिवार, 11 मार्च 2017

नवी दिल्ली- उत्तर प्रदेश, उत्तराखंड व मणिपूरमध्ये भारतीय जनता पक्षाने विजय मिळविला आहे. सध्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यापेक्षा कोणी मोठे नाही. यामुळे 2019 विसरा आणि 2024च्या तयारीला लागा, असे जम्मू-काश्मीरचे माजी मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी आज (शनिवार) म्हटले आहे.

अब्दुल्ला यांनी ट्विटरवरून म्हटले आहे की, 'देशात सध्यातरी मोदींपेक्षा कोणीही मोठा नेता नाही. यामुळे 2019 विसरा आणि 2019 मध्ये होणाऱया निवडणुकांसाठीच्या तयारीला लागा.'

पंजाब व गोव्यामध्ये काँग्रेसला यश मिळाले आहे. परंतु, सगळीकडेच भाजपची मक्तेदारी नसल्याचे मतदारांनी दाखवून दिले आहे, असेही अब्दुल्ला यांनी म्हटले आहे.

Web Title: Forget 2019, no leader can take on Narendra Modi then- Abdullah