जयललितांचा बंगला हडपण्याचा प्रयत्न

वृत्तसंस्था
रविवार, 30 एप्रिल 2017

काही दिवसांपूर्वी या मालमत्तेचे संरक्षण करणाऱ्या वॉचमनचाही अज्ञात लोकांनी खून केला होता. जयललिता यांच्या या भव्य इमारतीस अकरा दरवाजे आहेत. या प्रकरणातील एक आरोपी कनकराज याचे काही दिवसांपूर्वी अपघातात निधन झाले होते.

तिरुअनंतपुरम - तमिळनाडूच्या माजी मुख्यमंत्री जे. जयललिता यांची कोईमतूर येथील "कोडानड इस्टेट' हडपण्याचा प्रयत्न करणाऱ्या अकरा जणांना मल्लपुरम पोलिसांनी अटक केली आहे.

काही दिवसांपूर्वी या मालमत्तेचे संरक्षण करणाऱ्या वॉचमनचाही अज्ञात लोकांनी खून केला होता. जयललिता यांच्या या भव्य इमारतीस अकरा दरवाजे आहेत. या प्रकरणातील एक आरोपी कनकराज याचे काही दिवसांपूर्वी अपघातात निधन झाले होते. या इमारतीमध्ये लाखो रुपयांच्या मौल्यवान वस्तूंचा समावेश असल्याचे बोलले जाते.

काही दिवसांपूर्वी "कोडानड' बंगल्याचे संरक्षण करणारा शिपाई बहाद्दूर याचा अज्ञात लोकांनी खून करून बंगल्यातील महत्त्वाची कागदपत्रेही लंपास केली होती. यानंतर काही दिवसांतच माजी चालक कनकराज याचाही कोईमतूरमध्ये संशयास्पद मृत्यू झाला होता. याच प्रकरणातील दुसरा आरोपी सायनची पत्नी विनुप्रिया आणि मुलगी नितू पलक्कड येथे कारमध्ये मृतावस्थेत आढळून आल्या होत्या. सायन हा कोईमतूरमधील बेकरीमध्ये काम करत होता.