गजेंद्र चौहानांच्या वादग्रस्त कारकिर्दीची अखेर

वृत्तसंस्था
गुरुवार, 2 मार्च 2017

एफटीआयआयच्या अध्यक्षपदाचा काळ माझ्यासाठी चांगला होता. 'मिनी फिल्म सिटी'मधील डिप्लोमा आणि पदव्युत्तर शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांशी संपर्क राहिला.

पुणे - भारतीय चित्रपट व दूरचित्रवाणी संस्थेचे (एफटीआयआय) अध्यक्ष गजेंद्र चौहान यांच्या वादग्रस्त 19 महिन्यांच्या कारकिर्दीची अखेर शुक्रवारी होत आहे. विद्यार्थ्याच्या आंदोलनामुळे चौहान यांच्या निवडीचे प्रकरण देशभर गाजले होते.

गजेंद्र चौहान एफटीआयआयच्या अध्यक्षपदी एक वर्षे, सात महिने असे 19 महिने होते. त्यांच्या निवडीला एफटीआयआयमधील विद्यार्थ्यांकडून जोरदार विरोध करण्यात आला होता. अनेकवेळा आंदोलन करण्यात आले होते. त्यामुळे चौहान यांना पदाचा कार्यभार स्वीकारण्यास उशीर झाला होता.

एका वृत्तपत्राशी बोलताना चौहान म्हणाले, की एफटीआयआयच्या अध्यक्षपदाचा काळ माझ्यासाठी चांगला होता. 'मिनी फिल्म सिटी'मधील डिप्लोमा आणि पदव्युत्तर शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांशी संपर्क राहिला. नवा अभ्यासक्रम आणि क्रेडिट बेस्ड चॉईस सिस्टीम अवलंबिण्यात आली. विद्यार्थ्यांचाही मला पाठिंबा होता.

Web Title: Gajendra Chauhan's controversial 19-month tenure as FTII Chairman ends on 3 March