अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार

वृत्तसंस्था
गुरुवार, 31 ऑगस्ट 2017

शहाजहानपूर (उत्तर प्रदेश) - नैसर्गिक विधीला जात असताना एका अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार करण्यात आल्याची घटना येथे उघडकीस आली आहे, असे पोलिसांनी सांगितले.

शहाजहानपूर (उत्तर प्रदेश) - नैसर्गिक विधीला जात असताना एका अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार करण्यात आल्याची घटना येथे उघडकीस आली आहे, असे पोलिसांनी सांगितले.

पीडित मुलगी काल नैसर्गिक विधीला जात असताना तिघांनी तिला शेतात खेचत नेऊन तिच्यावर बलात्कार केला, असे पोलिसांनी सांगितले. मुलीच्या कुटुंबीयांनी दिलेल्या तक्रारीनंतर तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पीडित मुलीला वैद्यकीय तपासणीसाठी पाठविण्यात आले आहे.