गौरी लंकेश हत्येप्रकरणी केंद्राला अहवाल सादर

पीटीआय
शनिवार, 9 सप्टेंबर 2017

या खळबजनक घटनेबाबतची सत्य परिस्थिती व पोलिसांनी सुरु केलेल्या तपासाची माहिती अहवालात दिली आहे. राज्याचे मुख्य सचिवांनी हा अहवाल तयार केला आहे. याची चौकशी करण्यासाठी व गौरी लंकेश यांच्या मारेकऱ्यांना शोधण्यासाठी विशेष तपास पथकाची नियुक्ती केली असल्याचे या अहवालात म्हटले आहे

नवी दिल्ली - पत्रकार गौरी लंकेश यांची बंगळूरमध्ये हत्या केल्याप्रकरणाचा कर्नाटक सरकारने तयार केलेला अहवाल केंद्रिय गृह मंत्रालयाला मिळाला आहे.

या खळबजनक घटनेबाबतची सत्य परिस्थिती व पोलिसांनी सुरु केलेल्या तपासाची माहिती अहवालात दिली आहे. राज्याचे मुख्य सचिवांनी हा अहवाल तयार केला आहे. याची चौकशी करण्यासाठी व गौरी लंकेश यांच्या मारेकऱ्यांना शोधण्यासाठी विशेष तपास पथकाची नियुक्ती केली असल्याचे या अहवालात म्हटले आहे, अशी माहिती गृह मंत्रालयाने दिली.

या हत्येची सविस्तर माहिती घेण्याचा आदेश गृह मंत्री राजनाथ सिंह यांनी केंद्रिय गृह सचिव राजीव गौबा यांना दिला होता. त्यानंतर कर्नाटक सरकारने याविषयी अहवाल तयार केला.