भाजप नेत्याच्या मुलाकडून युवतीवर बलात्कार

वृत्तसंस्था
बुधवार, 7 डिसेंबर 2016

अहमदाबाद- भारतीय जनता पक्षाच्या नेत्याच्या मुलाने लग्नाचे आमीष दाखवून एका 19 वर्षीय युवतीवर बलात्कार केल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी संबंधित दलित युवतीने तक्रार दाखल केली असल्याची माहिती पोलिसांनी दिली. 

संबंधित नेता गुजरातमधील सुरेंद्रनगर जिल्ह्यातील पातडी येथील भाजपचा तालुकाध्यक्ष आहे, असे पोलिस उपअधीक्षक एम.आर. शर्मा यांनी सांगितले. 
बिट्टू पटेल (वय 23) असे आरोपीचे नाव असून, तो आपल्याला मंगळवारी रात्री येथील एका हॉटेलमध्ये घेऊन गेला, आणि लग्नाचे आमीष दाखवून शारीरिक संबंध ठेवण्यास भाग पाडले, असे पीडित तरुणीने तक्रारीत म्हटले आहे. 

दोघेही एकमेकांना शाळेत असल्यापासून ओळखतात. ते पातडी येथील एकाच कॉलेजमध्ये शिकले, अशी माहिती पोलिसांनी दिली. याप्रकरणी आरोपीविरुद्ध प्राथमिक चौकशी अहवाल (FIR) दाखल करण्यात आला आहे. पीडित मुलीला वैद्यकीय चाचणीसाठी पाठविण्यात आले आहे. अॅट्रॉसिटी कायद्याअंतर्गतही आरोप ठेवण्यात आले असून, अद्याप पटेल याला अटक करण्यात आलेली नाही. 
 
देश

नवी दिल्ली : भारत आणि चीनदरम्यान डोकलाममध्ये सुरू असलेल्या पेचावर लवकरच तोडगा काढला जाईल, असे सांगतानाच केंद्रीय गृहमंत्री...

06.03 AM

आता मुहूर्त शुक्रवारनंतरचा शक्‍य नवी दिल्ली: केंद्रीय मंत्रिमंडळाच्या विस्ताराची पहिली तारीख लांबण्यामागे सत्तारूढ भाजप...

05.03 AM

कोलकता: संपूर्ण दार्जिलिंगमध्ये वेगळ्या गोरखालॅंडसाठी चळवळ उभी करणारा गोरखा जनमुक्ती मोर्चाचा नेता बिमल गुरुंग याला आपल्या हातून...

सोमवार, 21 ऑगस्ट 2017