बुडा नाहीतर मरा; पैसे परत करा: स. न्यायालय

वृत्तसंस्था
बुधवार, 7 सप्टेंबर 2016

नवी दिल्ली - ""घर घेण्यासाठी नागरिकांनी त्यांच्या कष्टाचा पैसा गुंतविला आहे. बांधकाम व्यावसायिक वा विकसकाच्या खराब आर्थिक स्थितीमुळे नागरिकांना कोणत्याही परिस्थितीत त्रास होता कामा नये. यामुळे इमारतीच्या योजनेमध्ये पैसा गुंतविलेल्या सर्व नागरिकांना त्यांचा पैसा मिळालाच पाहिजे,‘‘ अशी रोखठोक भूमिका सर्वोच्च न्यायालयाकडून आज (बुधवार) घेण्यात आली. नोएडामधील "एमेराल्ड टॉवर्स‘ संदर्भातील या खटल्यामध्ये गुंतवणूकदारांचे सर्व पैसे त्यांना परत मिळायलाच हवेत, अशी तंबी न्यायालयाकडून सुपरटेक या कंपनीस देण्यात आली आहे. 

""तुम्ही जगता का मरता, याच्याही आम्हाला काही देणेघेणे नाही. घरासाठी पैसा गुंतविलेल्या सर्वांना त्यांचे परत मिळायलाच हवेत. तुमच्या आर्थिक स्थितीची आम्ही पर्वा करणार नाही,‘‘ असे न्यायाधीश दीपक मिश्रा आणि ए के गोयल यांच्या खंडपीठाने सुपरटेक कंपनीस सुनावले. 

याचबरोबर, कंपनीने याआधी आश्‍वासन दिल्याप्रमाणे चार आठवड्यांच्या आत या गृहयोजनेत पैसे गुंतविलेल्या 17 नागरिकांना त्यांचे पैसे परत दिले जावेत, असा गर्भित इशारा न्यायालयाकडून कंपनीस यावेळी देण्यात आला. या प्रकरणाच्या पुढील सुनावणीपर्यंत हे काम व्हायलाच हवे, असे खंडपीठाकडून यावेळी स्पष्ट करण्यात आले. याचबरोबर, या गृहयोजनेच्या ठिकाणाचे परीक्षण करुन विकसकाकडून नियमावलीचा भंग करण्यात आला आहे अथवा नाही, याचा तपास करण्याचे निर्देशही न्यायालयाकडून यावेळी राष्ट्रीय इमारत प्राधिकरणास देण्यात आले. 

आर्थिक कारण पुढे करुन गुंतवणूकदारांचे पैसे परत न करण्याची भूमिका न्यायालयात घेणारी सुपरटेक ही गेल्या काही महिन्यांतील तिसरी कंपनी आहे.