बेळगाव जिल्हाधिकारी कार्यालयातील  "स्पंदन' केबिनची फोडली काच 

बेळगाव - "स्पंदन' केबिनची फोडण्यात आलेल्या काचेची पाहणी करताना एन. व्ही. बरमानी व पोलिस. 
बेळगाव - "स्पंदन' केबिनची फोडण्यात आलेल्या काचेची पाहणी करताना एन. व्ही. बरमानी व पोलिस. 

बेळगाव - जिल्हाधिकारी कार्यालयातील स्पंदन विभागाच्या केबिनची काच फोडण्यात आली. उताऱ्यासह पाहणीपत्र स्पंदनमधून मिळते. रांगेमध्ये थांबण्यावरून जोरदार भांडण आज (ता.3) सकाळी साडे अकराच्या सुमारास झाले. यापैकी एकाने केबीनच्या दर्शनी भागाच्या काचेवर जोरदार हात मारले. घटनेनंतर भांडण करणाऱ्या दोघांनी पळ काढला. काचेचे तुकडे केबीन आणि आवारामध्ये पडले. पोलिसांनी पंचनामा केला आहे. 

जिल्हाधिकारी कार्यालयात तिसऱ्या मजल्यावर स्पंदन विभाग आहे. तेथे सात बारा उताऱ्यासह रेशनकार्ड संदर्भातील अर्ज स्वीकारले जाते. याठिकाणी आज गर्दी होती. रांगेत थांबून उताऱ्यासाठी अर्ज देण्यात येत होते. दोघांमध्ये शाब्दीक चकमक उडाली. एकमेकांच्या अंगावर धावून गेले. पैकी एकाने रागाच्या भरामध्ये हात केबिनच्या काचेवर आपटले. दर्शनी भागाची काच फुटली. काचेचे तुकडे केबिन आणि आवारात पडले. घटनेमुळे काहीकाळय येथे धावपळ उडाली. 

भांडण व त्यानंतर फुटलेल्या काचेचा विषय वाऱ्यासारख्या पसरला. जिल्हाधिकारी कार्यालयातील अधिकारी, लोक पाहण्यासाठी गर्दी केली. जिल्हाधिकारी बी. एस. बोमण्णहळ्ळी यांना कल्पना दिल्यानंतर निवासी जिल्हाधिकाऱ्यांना चौकशीसाठी आदेश बजाविले. तर, पोलिसांना भेट दिली. एसीपी एन. व्ही. बरमानी यांनी माहिती घेतली. 

काच कोणी फोडली? 
स्पंदन केबिनची काच कोणी फोडली, त्याची चौकशी सुरु आहे. रांगेत थांबण्यावरून भांडण झाल्याची प्रथमदर्शनी माहिती आहे. खरोखर तसा प्रकार घडला आहे किंवा यामागे अन्य कारण आहे, त्याची माहिती घेतली जात आहे, असे पोलिसांनी सांगितले. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com