बंगळूरुत 'बेंगलूरू मराठी'तर्फे गोकुळाष्टमी उत्साहात

Gokulashtami celebrated in Bangalore by bangluru marathi facebook group
Gokulashtami celebrated in Bangalore by bangluru marathi facebook group

बेंगलूरू - 'बेंगलूरू मराठी' हा काही वर्षांपूर्वी फेसबुक वरून ओळख झालेल्या मित्रांनी एकत्र येऊन तयार केलेला हा ग्रुप आहे. या ग्रुपचा उद्देश बेंगलूरू मधील मराठी लोकांना एकत्र आणणे, एकमेकांची ओळख करून देऊन मदत करणे हा आहे.

'बेंगलूरू मराठी' पारंपरिक सण आणि विविध गुण दर्शनाचे कार्यक्रम आयोजित करतात. तसेच सामाजिक कार्य आणि त्याबद्दल लोकांमध्ये  जनजागृतीचे काम करते. महाराष्ट्राबाहेर राहून महाराष्ट्रातील आपल्या मराठी परंपरा जपण्याचे काम 'बेंगलूरू मराठी' सतत करत असते. 

'बेंगलूरू मराठी'तर्फे 2 सप्टेंबर ला बेंगलूरू मध्ये 'गोकुळाष्टमी' हा अतिशय उत्साहात करण्यात आला. लहान मुलांची वेषभूशा स्पर्धा आणि बालगोपाल दहीहंडी हे 'गोकुळाष्टमी' या कार्यक्रमाचे प्रमुख आकर्षण होते. कार्यक्रमाला 150 मराठी बंधू भगिनी आणि चिमुकले आले होते.

बंगलोरमधल्या मराठी बांधवानी एकत्र येऊन सांस्कृतीक कार्यक्रम आणि दंहीहंडी उत्सव साजरा केला. यावेळी बाळ गोपाळांनी आपल्या विविध कला दाखवत उपस्थितांची मन जिंकली. बाळगोपाळांचा उत्साह वाखाणण्याजोगा होता. यावेळी अनेक चिमुरड्यांनी आपल्या कलागुणांचे प्रदर्शन करत उपस्थितांची मनं जिंकली. अनेक लहानग्यांनी तोडीस तोड कला सादर करत मोठ्यांनाही आश्चर्याचा धक्का दिला. यावेळी बाळ गोपाळांनी दहीहंडी साजरी करत हा कृष्णोत्सव साजरा करण्यात आला. मुलांच्या पालकांनी सुद्धा गायन, नृत्य, कविता वाचन यासारख्या स्पर्धना भरभरून प्रतिसाद दिला. 

अशा सुंदर कार्यक्रमाची सांगता आभार प्रदर्शन करून करण्यात आली. 'बेंगलूरू मराठी'तर्फे महाराष्ट्राच्या बाहेर मराठी सण आणि उत्सव साजरे करत मराठी संस्कृती जपण्याचा प्रयत्न केला जातो. 'बेंगलूरू मराठी'मध्ये सगळेजण आपली नोकरी आणि परिवार सांभाळून निस्वार्थपणे बेंगलूरू मधील मराठी लोकांना एकत्र आणण्यासाठी काम करत असतात आणि त्यामुळेच आज 'बेंगलूरू मराठी' विषयी लोकांमध्ये खूप चांगली आस्था आहे. 

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com