काश्‍मीरमध्ये राज्यपालांची राजवट लागू करा- सागर

वृत्तसंस्था
मंगळवार, 18 एप्रिल 2017

श्रीनगर: काश्‍मिरी नागरिकांवर विशेषतः विद्यार्थ्यांवर लष्करी बळाचा वापर सरकार मोठ्या प्रमाणावर करीत असल्याच्या निषेधार्थ जम्मू-काश्‍मीरमधील नॅशनल कॉन्फरन्स पक्षाच्या युवा विभागाने मंगळवारी मोर्चा काढला. काश्‍मिरी जनतेला दिलासा मिळण्यासाठी राज्यात राज्यपाल राजवट लागू करावी, अशी मागणी जम्मू अँड काश्‍मीर यूथ नॅशनल कॉन्फरन्सचे अध्यक्ष सलमान सागर यांनी केली.

सागर यांच्या नेतृत्वाखाली कार्यकर्त्यांनी आज निषेध मोर्चा काढला. सरकारच्या निषेधार्थ आंदोलकांनी काळे कपडे परिधान केले होते. मुख्यमंत्री मेहबूबा मुफ्ती यांच्या विरोधात त्यांनी घोषणा दिल्या. पत्रकारांशी बोलताना सागर यांनी विद्यार्थ्यांशी आपली एकनिष्ठता व्यक्त केली. काश्‍मीर धगधगत असूनही सरकारला जाग येत नाही. काश्‍मीरसंदर्भात सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडिओंचा निषेधही त्यांनी केला नाही. राज्यात काहीच घडत नाही, असे सरकारला वाटत असेल तर ते अंध व मूकबधिर आहे, अशी टीका त्यांनी केली.

Web Title: Governor's rule in Kashmir applicable