नोटबंदीच्या निर्णयावर सरकार गोंधळलेले- ममता

वृत्तसंस्था
सोमवार, 21 नोव्हेंबर 2016

कोलकता - पाचशे आणि हजार रुपयांच्या नोटा चलनातून बंद करण्याचा सरकारने घेतलेल्या निर्णयावर दररोज नियम बदलले आहेत. नोटाबंदीची घोषणा केल्यापासून सरकारने १५ वेळा नियम बदलले. म्हणजेच, ते स्वत:च याबाबतीत गोंधळलेले आहेत, असे मत पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी व्यक्त केले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घेतलेल्या नोटाबंदीच्या निर्णयाला तृणमुल काँग्रेसकडून जोरदार विरोध करण्यात येत आहे. ममता बॅनर्जी यांनी या मुद्द्यावरून राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांची भेट घेतली होती. संसदेच्या दोन्ही सभागृहांमध्ये तृणमुलच्या खासदारांकडून सरकारकडे चर्चेची मागणी करत गोंधळ घालण्यात येत आहे.

याच मुद्द्यावर बोलताना ममता बॅनर्जी म्हणाल्या, की नोटबंदीच्या या निर्णयामुळे पांढरा पैसा सर्वसामान्यांकडून हिसकावून घेतला गेला आणि काळा पैसा आणखी काळा झाला आहे. या निर्णयाला आमचा विरोध सुरूच राहणार आहे. मी स्वत: 23 आणि 24 नोव्हेंबरला दिल्लीत उपस्थित राहणार आहे. आज देशातील मध्यम वर्गातील नागरिक, व्यापारी, मजूर आणि गृहिणींना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत आहे. देशातील नागरिक माझ्यासोबत आहेत. नोटाबंदी संदर्भात रोज नव्या घोषणा करण्याऐवजी केंद्राने ठोस 'अॅक्शन प्लान' जारी करावा.