जिवंतपणी मृत घोषित केलेल्या अर्भकाचा अखेर मृत्यू

वृत्तसंस्था
बुधवार, 6 डिसेंबर 2017

मृतदेह ताब्यात घेण्यास वडिलांचा नकार

ग्रेटर नोएडा: काही दिवसांपूर्वी दिल्लीतील मॅक्‍स रुग्णालयाकडून जिवंतपणी मृत घोषित केलेल्या एका नवजात अर्भकाचा आज अग्रवाल रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला. दोषी डॉक्‍टरांना अटक होत नाही, तोपर्यंत आपण मृतदेह ताब्यात घेणार नसल्याचा पवित्रा त्याच्या वडिलांनी घेतला आहे.

आशिष कुमार यांच्या पत्नीने 30 नोव्हेंबरला मॅक्‍स रुग्णालयात दोन जुळ्या अर्भकांना जन्म दिला होता. मात्र, मुदतपूर्व प्रसूतीमुळे दोन्ही बाळे दगावल्याचे डॉक्‍टरांनी जाहीर केले होते. त्यांना अंत्यसंस्कारासाठी नेताना त्यातील एक अर्भक जिवंत असल्याचे वडिलांच्या लक्षात आले. त्यानंतर खळबळ उडाली होती. जिवंत अर्भकावर पीतमपुरातील अग्रवाल रुग्णालयात उपचार सुरू होते. मात्र, अखेर त्याचाही मृत्यू झाला.

दरम्यान, अर्भकाच्या मृत्यूनंतर मॅक्‍स रुग्णालयाच्या व्यवस्थापनाकडून एक पत्रक काढण्यात आले असून, आम्ही शोकाकुल दांपत्याच्या दुःखात सहभागी आहोत. असे त्यात नमूद आहे. रुग्णालयाने दोन दोषी डॉक्‍टरांना यापूर्वीच निलंबित केले आहे.

चौकशी अहवाल सादर
या प्रकरणाचा चौकशी अहवाल समितीने आरोग्यमंत्री सत्येंद्र जैन यांच्याकडे सोपविला असून, त्यात दोन्ही अर्भकांवर उपचार करताना अक्षम्य दुर्लक्ष झाल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे. उपचारादरम्यान डॉक्‍टरांनी वैद्यकीय मार्गदर्शक तत्त्वांचे पालन केले नाही. तसेच, अर्भक जिवंत आहे का, हे पाहण्यासाठी करावयाची चाचणीही न झाल्याचे चौकशीत समोर आले आहे.

Web Title: greater noida news Death of the infant who was declared dead alive after life